निसर्ग सौंदर्य शिखर कविता १०८



⛰️निसर्ग सौंदर्य⛰️

दृश्य विहंगम शिखराचे 
काळ्याभोर पाषाणाचे 
कुतूहल मनाचे वाढवते 
पार करण्या खुणावते ❗

तिर्थाटनावर  बांधिव तळे 
मनाचे पावित्र्य जपते 
शुचिर्भूत होण्यासाठी 
डुबकी घ्यायला धजावते ❗

आकाश जलाशयाच्या मध्यावरी 
शिखराचा नजारा समोरी 
निसर्ग प्रेमींची रांग सभोवरी  
सुसाट वारे झोंबे अंगावरी ❗

लाईट खांबांची तोरणं
पायऱ्यापायऱ्यांच तळं
कुंडीतल्या रोपांचं वाढणं
डोंगरी पठाराचं रुप वेगळं❗

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प १०८
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड