कोजागिरी पौर्णिमा काव्य पुष्प-१२२



🌝💫🌝💫🌝💫         
       कोजागिरी पौर्णिमा

धानाच्या ओंब्यांची तोरणं बांधूया 
कोजागिरी पौर्णिमेला नवान्न पुजूया 
मित्र कुटूंबासवे शांत स्थळी जाऊया
नभीचं तारांगण मनसोक्त  पाहूया❗

मसाला दूध केशर बदाम चारोळीचे  
चंद्राच्या प्रकाशात मंदाग्नीवर आटवूया 
कढईतल्या दुधात दिसते प्रतिबिंब चंद्राचे  
नयनमनोहरी  दृश्य मनात साठवूया ❗

आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेऊया 
गाणी गप्पागोष्टींची मैफिल सजवूया 
रात्रीचं शीतल चांदणं  मनभरुन पाहूया 
शुभ्रधवल चांदण्यात न्हावून जावूया ❗

मसाला दूध प्राशन करीत 
मजेत पुनव साजरी करुया 
शांत शीतल रुपेरी प्रकाशात
शरदाचं पिठूर चांदणं पाहूया ❗

मसाला दुधाचा आस्वाद घेऊनी  
कोजागिरीला जागरण करूया
गुलाबी थंडीची चाहूल जाणूनी 
आनंदाच्या दिवाळीची वाट पाहूया ❗

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१२२
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

  1. अप्रतिम सर
    कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर#

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड