विजयादशमी दसरा काव्य पुष्प ११७




दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा....
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ❗
🌻🌸🌻🌸🌻🌸🌻🌸  
              दसरा 

दसरा दिवाळीला झेंडूचा मान 
शौर्याचे प्रतिक आपट्याचे पान 
 प्रसन्न ऊर्जेची अमाप खाण 
शक्ती भक्तीचा घेऊया वाण❗ 

विजयीआनंद उत्सव साकारुया
विजयादशमी साजरी करुया 
गावपांढरीला रामराम घालूया 
स्नेहाची नातीगोती जपूया 
 ❗

ग्रामदेवतांची निघे पालखी सोहळा  
वाद्यांच्या गजरात गाव प्रदक्षिणेला 
गावकरी आलिंगनती  एकमेकाला 
आपटा सुवर्ण पाने अर्पती  देवाला❗

झेंडूच्या फुलांचे तोरण 
सजले दारोदारी 
वाहने,शस्त्रे,हत्यारे 
सयंत्रे पूजन घरोघरी ❗
💫💫💫💫💫💫💫
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ११७

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड