कविता गणपती बाप्पा मोरया ६७

सर्वांना गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
गणपती बाप्पा मोरया
सर्वांना गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
गणपती बाप्पा मोरया
हे गणनायका...
ऊर्जा तू प्रकाश तू
मंगल मूर्ती तू किर्तीवंत तू
उत्साह तू आनंद तू
अधिपती तू विघ्नहर्ता तू
हे गजानना ...
वरद तू विनायक तू
ध्यास तू श्र्वास तू
कर्तासि तू धर्तासि तू
दाता तू ज्ञाता तू
हे मोरया...
सत्य तू सुंदर तू
मंगल तू पवित्र तू
नृत्य तू ताल तू
गीत तू संगीत तू
हे मोरेश्वरा...
भक्ती तू श्रद्धा तू
निसर्ग तू धरा तू
बुध्दी तू सिध्दी तू
चेतना तू तेज तू
गणपती बाप्पा मोरया
मंगल मुर्ती मोरया
तुझ्या कृपेने जीवनचक्र
बदलू दे बाप्पा
कोरोनाचे विघ्न घालव
रे बाप्पा !!!
काव्यपुष्प ६७
गणपती बाप्पा मोरया
ReplyDelete