समतल चर कविता ७४
समतल चर
डोंगर उतारावरची
पडीक जमीन
चर काढण्या
झाली संपादन
उन्हाळ्याच्या दिवसात
लोकांनी घाम गाळला
समतल चर खोदलं
पाणी साठवायला
आकाश काळे भोर
मेघांची दाटीवाटी
पावसाची बरसात
भिजली माती
समद्या रानी पाऊस पडला
ओलीचिंब भिजली धरा
पाणी पाझरत प्रवाहिले
झिरपत साठले चरा
संधारणाचं काम झाले
समतल चर भरले
जमिनीत मुरले
भूगर्भात साठले
अशी ही किमया
कष्टाने साधली
पाऊस जलाची
उंचावली पातळी
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ७४
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी
Nice
ReplyDelete