कविता माझी ४९


     माझी कविता 
संग्रहालय पाहूनी  थकलो 
झाडाच्या सावलीत टेकलो
 थोडंसं निवांतपणे बसलो
हसऱ्या शिल्पांना बिलगलो

शिल्पकला  पाहून आनंदलो
मुखावरील हास्याने सुखावलो
आता तीनाचे चार झालो 
छायाचित्रात अडकलो

स्मितहास्य चेहऱ्यावर झळकले 
छबी बघूनी हास्य उमटले
हसरे क्षण अचूक टिपले
मित्राला धन्यवाद दिले..

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ४९

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड