रक्षाबंधन कविता ४८
रक्षाबंधन 🔆
भावाबहिणीची अपार माया
बांधती बंध पडती पाया
पाठिशी रहा भाऊराया
तुझ्या कृपेची मिळूदे साया
संचित होईल प्रेमधन
नाजूक धाग्यात गुंफन
नात्याच्या उत्कर्षाचा सण
आनंदाने फुलले मन
बहिणभावाचं नातं
शंभूराजे अन् राणूअक्कां सारखं
संकटसमयी पाठबळ देवून
भावाची पाठराखण करण्या सारखं
ओढ लागते वाटेची
बहिणीच्या आगमनाची
उत्सव साजरा करुया
मायेची नाती जपूया
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
मोबाईल नंबर-७०८३१९३४११
मस्तच
ReplyDelete1 नंबरच..!!!
ReplyDelete
Deleteछान खूपच