गौराई सण कविता ७०
गौरी,गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!!
सण गौराईचा
महिलांच्या आनंदाचा सण
गौरींचे करुया अवाहन
गौराईला सजवण्यात जाय
क्षणोक्षण
सुख शांतीचं लाभे समाधान
तीन दिस आनंदाला येत उधाण
कवतिकाच्या गाण्याचं होई गुणगाण
पहिल्या दिवशी होई आगमन
पूजेला लागतीय पत्री पान
दुसऱ्या दिवशी गौरीपूजन
महिलांच्या हर्षाचा उत्सवी सण
सरबराईच्या पदार्थांने सजले पान
घरोघरी हळदीकुंकवाला मिळे मान
गौराई लक्ष्मी घेवूया
फेर धरूनी नाचूया
महतीची गाणी गावूया
आनंदाने निरोप देवूया
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ७०
आमच्या गौरी
ReplyDelete