निसर्गरम्य परिसर कविता ५९
निसर्गरम्य परिसर
जलाशय दिसे आरश्यासवे
डोंगराचे खुलले रुप नवे
हिरव्यागार प्रतिबिंबाची छाया
सजतेय जलावर मोह माया||
डोंगरांच्या कुशीतली
गावं झाडीत दडली
जलाशयाच्या सभोवताली
शिवारं पिकांनी फुलली||
जल करी समृद्ध जीवन
तृष्णा भागवी चराचरांची
जलसंपदेचा संचय करून
गरज भागवी भविष्याची ||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ५९
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.https://raviprema.blogspot.com
Nice
ReplyDelete