चारापाणी काव्य पुष्प ११९
चारापाणी
चांदणीच्या झाडावरी
माझ्या शाळेच्या अंगणी
चिमणी पाखरं टिपती
खाऊ चारा अन् पाणी ❗
शाळेत मुलांचा किलबिलाट
झाडावर चिमण्यांचा चिवचिवाट
दाणं टिपण्या झुंबड उडते
भांड्यावर बसून गप्पा मारते ❗
कोलाहलामुळे मी दरवाज्यातून बघतो
चारा टिपणं पाहून आनंदतो
पाय न वाजविता व्हरांड्यात येतो
आम्ही सगळेच त्यांना न्याहाळतो ❗
आमच्या गोंगाटाची चाहूल लागते
भुरकन उडून भरारी मारते
मग आमचं ध्यान भानावर येतं
आमचं शिकणं पुढं सुरू होतं ❗
काव्य पुष्प ११९
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
प्रतिक्रिया
पाखरांची चिवचिव...
मंजुळ असते सदा...
लटींगे सरांची कविता आहे..
लडिवाळ प्रतिभेची अदा.
श्री राजेन्द्र वाकडे सर तारळे पाटण
मस्तच रचना
ReplyDeleteखूपच छान काव्यरचना👌
ReplyDelete