सालपाई माता कोंढावळे काव्य पुष्प ११२




नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ❗कोंढावळे निवासिनी श्री सालपाई देवी चरणी शतशः नमो नमः आईच्या चरणी साष्टांग दंडवत....

🚩सालपाई माता 🚩     
उत्सव नवरात्रीचा
जागर स्त्रीशक्तीचा
मातृशक्तीच्या उत्सवाचा 
घट स्थापना करण्याचा 🌾

विचारांची पुष्पमाला बांधली
सजावट पर्णमालेची सजली
चैतन्याचा तेवता नंदादीप
दिसे तेजोमय मातेचे रुप 🌾

भक्तिभावाने जन लोटती 
देवीपुढे नतमस्तक होती 
मातेची थोरवी फार अपार  
चैतन्य ऊर्जेचा करी पाझर 🌾

महिमा भावभक्तीचा 
तेजस्वी नवप्रकाशाचा
नंदादीपाच्या तेवण्याचा 
व्रतवैकल्ये करण्याचा 🌾

पिवळ्या फुलांची माळ बांधूया 
कडाकणी देवीस अर्पण करुया 
देवीची नवरुपात पूजा बांधूया
लोककलांचा जागर घालूया 🌾

कोंढावळे ग्रामी स्वयंभू देवी सालपाई 
समस्त भाविक जनांची श्रीवरदायिनी 
नवरात्रीत समयांच्या प्रकाशती ज्योती 
भक्तीभावाने देवीच्या दर्शना जन येती 🌾


काव्य पुष्प ११२

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
फोटो साभार -श्री अंकुश कोंढाळकर

Comments

  1. सुंदर शब्दांकन👌👌

    ReplyDelete
  2. अप्रतिम👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड