माझी भटकंती सांगली अधिवेशन १०३
☘️🔆☘️🔆☘️🔆☘️🔆☘️
माझी भटकंती
भाग क्रमांक
🛕 सांगली,नरसोबाचीवाडी व प्रवास 🛕
सन २००८
⚡⚡⚡☘️⚡⚡⚡
सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील गटसमन्वयक,साधनव्यक्ती आणि केंद्र समन्वयक आणि इतर साधनव्यक्तींचे राज्यस्तरीय अधिवेशन न्याय मागण्यांसाठी सांगली येथे आयोजित केले होते.यास्तव वाई तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून आम्ही अधिवेशनाला जायचं निश्चित झाल्यावर मी आणि श्री डी.एम.पोळ ,श्री शेखर जाधव,श्री अरविंद चोरट,श्री बाळकृष्ण पंडीत,सौ शोभा पंडित,सौ प्रेमा लटिंगे असे वाईतून सांगलीकडे ओमनी गाडीतून रवाना झालो.वाई ते सांगली १६०किमीचे अंतर म्हणजे चार एक तासांचा प्रवास होता. प्रवासात सर्व शिक्षा अभियान आणि अधिवेशन यावर चर्चा करत गप्पा मारत प्रवास चालला होता. सकाळी अकराच्या दरम्यान आम्ही चौकशी करत अधिवेशन स्थळी पोहोचलो.बऱ्यापैकी साधनव्यक्तींची वर्दळ दिसत होती.छोटेखानी सोहळा सुरू होता.राज्य कार्यकारिणीच्या न्याय मागण्यावर वक्ते विचार मंथन करत होते.राज्याच्या कार्यकारिणीची निवड घोषणा करण्यात आली.
निवेदन शासन दरबारी पोहचविण्याचे आश्र्वासन
देवून अधिवेशनाचा समारोप झाला.. मग माघारी निघण्यापेक्षा २५ किमीवरील नरसोबाची वाडीला देवदर्शन करून जायच का?.अशी आमच्यात चर्चा झाली.आणि मग उन्हाच्या तडाख्यात आम्ही नरसोबाच्या वाडीकडे मार्गस्थ झालो.अर्ध्या तासाचा तर प्रवास होता.
श्री दत्त महाराजांची राजधानी म्हणून लौकिक असलेले धार्मिक तीर्थक्षेत्र.सांगली आणि कोल्हापूरच्या जवळील रम्य ठिकाण कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पवित्र संगमावरील पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र.इथं पोहचल्यावर आम्ही सगळे नदीतीरावरील मंदिराकडे निघालो. रस्त्याच्या दुतर्फा खाऊ आणि प्रसादाच्या दुकानांची रेलचेल होती.नृसिंह सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेले स्थळ आहे.कृष्णेच्या प्रशस्त घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली मंदिर आहे. वृक्षतळी पादुकांची स्थापना नृसिंह सरस्वती यांनी केली आहे.इथं मंदिरापुढे मोठा गोलावर मंडप असून त्याच्या चारही बाजूला उंच व विस्तृत खांब आहेत.गाभारा लहान आहे.इथं नित्य पालखी सोहळा असतो.पादुकांचे दर्शन घेतले. मंदिरातील पादुकां आणि नदीच्या पात्राविषयी चर्चा करत घाटावर आलो.नदीचे विस्तीर्ण पात्र,बांधीव घाट,देऊळ आणि औदुंबर पार असं दृश्य सुंदर दिसते.अशातच घाटावर शांतपणे बसून नदीचे प्रवाही पात्र बघण्याचा विलक्षण आनंद मिळतो.संपूर्ण भक्तिमय वातावरण मनाला भुरळ घालते.इथं दत्तसेवेकरी भक्तांसाठी धर्मशाळा, भक्तनिवासआणि प्रसादालय आहे.
दुपारचे दोन वाजले होते.
चालताना हॉटेल बघतच निघालो होतो.भूकेची जाणीव झाल्याची झाली.एके ठिकाणी छानपैकी ताजी,कोवळी, लालबुंद आणि लुसलुशीत गाजराच्या जुडीने लक्ष वेधले.पटकन तिकडे वळलो.दराची चौकशी करताना एक गाजर चवीला मागितले.त्याचा तुकडा मोडून खाल्ला.गावरान गाजर गोड लागली मग प्रत्येकाने एकेक किलो खरेदी केली.त्याच्या बरोबर तिकडील प्रसिद्ध काकडी (वाळकं)ही किलोभर घेतली हाॅटेल पाहत निघालो. थोडंसं पुढे आल्यावर सगळीकडे भोजनालयेच दिसत होती.आम्ही वामन थाळी भोजनालयात गेलो.तिथं जेवण तयारच होतं.काकडी- गाजर सलाड अन्य गरमागरम शाकाहारी भोजनाचाआस्वाद घेतला.

तदनंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.प्रवासातच गप्पागोष्टी करत असताना पोळ सरांनी सासुरवाडी आज यात्रा आहे.आपण सगळे तिकडं जेवण करून मग वाईला जावू या,असं बोलले.मग आम्ही संमती देताच त्यांनी सासुरवाडीला फोन करुन सांगितले.
तिकडे जाऊन रात्रीचे भोजन करुन वाईला परतलो.
छान छान आठवणी
ReplyDelete