२९|पुस्तक परिचय,रामनगरी
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚
३०|पुस्तक परिचय
रामनगरी
लेखक-राम नगरकर
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
"रामनगरी"या लोकप्रिय हसवाफसवी एकपात्री प्रयोगाचे आत्मकथाकार,लोकनाट्य अभिनेते आणि चित्रपट कलावंत हास्यसम्राट राम नगरकर यांचे आत्मचरित्र आहे.वसंत सबनीस दादा कोंडके लिखित ''विच्छा माझी पुरी करा''मधील 'मावशी'च्या अफलातून भूमिकांमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले.त्यानंतरच्या 'कथा अकलेच्या कांद्याची'आणि 'लाडाची मैना तुमची',या महाराष्ट्रात गाजलेल्या लोकनाट्यातील अभिनयासह मराठी चित्रपटात केलेल्या भूमिकाही गाजलेल्या होत्या.आपल्या खास गावरान शैलीत स्वत:च्याच अंधश्रद्धा,मूर्खसमजुती,बेगडी प्रतिष्ठा, खोटा लौकिक,दंभपणा ,अहंकार यांची प्रच्छन्नता परंतु रांगडी टवाळी उडवून रसिक वाचकांना हास्यात डुंबायला लावणारी त्यांची आत्मकथा आहे.
या चरित्रात्मक पुस्तकाला महाराष्ट्राचे लाडके प्रतिभावंत ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडे यांची अफलातून शैलीत मिश्किली ढंगातील प्रस्तावना आहे.ही 'रामनगरी 'राम नगरकरांचे चरित्र वाचायला उत्कंटा वाढविते. प्रस्तावनेत ते सांगतात,'कुणी कल्पनाही केली नसेल की 'रामनगरीत' राम नगरकरने कमालीच्या सहजपणे आपल्या जीवनपटातील सुखदु:खाचे यशापयशाचे प्रसंग रेखाटलेआहेत.रसिक श्रोत्यांत 'सोंगाडे' म्हणून नावलौकिक असणारे दादा कोंडके,निळू फुले आणि राम नगरकर ही जुनी मित्रमंडळी.
ह्या तिघांची नुसती नावं घेतली तरी पब्लिक जाम खुश व्हायचं.तमाशा,नाटकं आणि सिनेमात गेले तरी मूळ बाज ठेवणारे.पण रामने उडी मारुन जी झेप घेतली अन् एकपात्री प्रयोगातून रामनगरीने चमत्कार केला.' असं पु.ल.देशपांडे म्हणतातखरचं एकदा का हे पुस्तक वाचायला सुरुवात केली की देहभान विसरून मी पुस्तकात गुंगून गेलो.काही प्रसंगाचे वर्णन वाचताना अक्षरक्ष:एकटाच हसायला लागलो.एवढं मजेशीर खास शैलीत आज्जा मारतीदा, वडिल विठोबा,आई आणि स्वत:चे वर्णन करणारा लेखन क्षेत्रात एखादाच हरहुन्नरी चतुरस्त्र कलाकार !
स्वाभिमान जपत अभिमानाने घराण्याची महती आपल्या गावरान ढंगात सांगणारा आज्जा! रामशी बोलताना शिव्यांनी पाणउतारा करणारे वडिल.ही पात्रं आपल्याशी आत्मकथेतून फटकरताना दृष्टीस पडतात.त्यांच्या जीवनाचे कथाकथन वाचताना,आपण पोटात कळा येई पर्यंत हसत हसत शहाणे होतो.त्यांच्या लेखन कौशल्याचे वैशिष्ट्य म्हणजे नगरकरांनी मानहानीकारक आणि दु:खाच्या प्रसंगीही निर्मळ हास्यांचे मळे या कथेतून पिकवले आहेत.
'रामनगरी' ही एका भल्या आणि गमत्या स्वभावाच्या बोलक्या माणसाने आपल्या भोवतालच्या माणसांकडे असंख्य गुणदोषांनी युक्त असा माणूस म्हणून जगत असलेली, पहात असलेली, सांगितलेल्या स्वत:च्या जीवनाची कहाणी आहे.घडलेले आणि अनुभवलेले गमतीने सांगितले आहे.ते ऐकताना वाचताना डोळ्यांना पाणी येईपर्यंत आपण हसत राहतो.विनोद ही नुसती शैली नाही तर ती वृत्ती आहे.
स्वत:च्या फजितीच्या कथा सांगत सांगत नुसते अहंकार घेऊन जगणाऱ्या अनेकांची फजिती करून बुरखे फाडले आहेत.विनोदसम्राट हास्यकारांनी जन्मकथा,लग्नकथा ,पोस्टाच्या नोकरीतील किस्से,गायनाच्या हौसेसाठी बडोद्याला पळून जाणं,राष्ट्र सेवादल आणि कलापथकातील गमतीदार प्रसंग आणि दौऱ्यांचे अस्सल गावरान शैलीत आणि खुमासदार मिश्किल शैलीत वर्णंन रसिक वाचकांना खिळवून ठेवते.कलाकार गायक होण्यासाठी केलेल्या उठाठेवींचे वर्णन लाजवाब शब्दात केले आहे.घरातील सुख- दु:खाच्या प्रसंगांचे वास्तव लेखन केले आहे.पोस्टातील पोस्टमन सेवेच्या डाकुमेंटरीसाठी झालेली निवड आणि चित्रण याचं इत्यंभूत वर्णन संवादातून वेगळीच मजा घडविते.वाचनात वाचक रमून जातो.
चित्रिकरणासाठी मिळालेल्या सवलतीचा फायदा घेऊन कलापथकाचे कार्यक्रम सादर करीत होते.तसेच पोस्टमनची नोकरी करत करत,मुंबई आणि पुण्यात एयरकंडिशनर सलून मित्रांच्या मदतीने कसं सुरू करतात या कथांचे लेखनही संवेदना भावना व्यक्त करणारे लेखन आहे.कलाकार होण्यासाठी अनेक प्रयत्न कसे केले यांचेही वाचताना दर्शन घडते.प्रांजळपणे ते कबूल करतात,की नट होण्याची माझी धडपड संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कलापथकांनी पुरी केली.राजधानी दिल्लीसह महाराष्ट्राच्या अनेक भागात त्यांचे लोकनाट्याचे प्रयोग झालेले आहेत.त्यातील अनेक किस्से मिश्किलपणे लिहिले आहेत.लोकनाट्य अभिनेते राम नगरकरांनी राष्ट्र सेवादल आणि कलाप्रकार ज्यांचा सहवास लाभलेल्या वसंत बापट,लीलाधर डाके,निळू फुले आणि सुधाताई वर्दे या स्नेह्यांना ही आत्मकथा अर्पण केली आहे.
एक विनोदी ढंगातील स्वलिखित आत्मकथा वाचून खूपच आनंद झाला.दिलखुलासपणे हास्य चेहऱ्यावर झळकले..अप्रतिम शब्दांकन "रामनगरी" आत्मकथेचे !
✒️परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
सुंदर शब्दांकन
ReplyDeleteसुंदर शब्दांकन
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDeleteखुपच छान शब्दात पुस्तक परिचय
ReplyDelete