२५|पुस्तक परिचय,माझा भारत
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚
२६|पुस्तक परिचय
माझा भारत
लेखक- जिम कॉर्बेट
अनुवाद-प्रा.वेदकुमार वेदालंकार
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
लेखक जिम कॉर्बेट यांनी पाहिलेला, अनुभवलेला भारत आणि खेड्यातील साधे-भोळे, प्रामाणिक कष्टाळू आणि धनहिन लोकांची जीवनशैली आणि जंगल यांचे चित्रण व्यक्तीरेखांत साकारले आहे.वादळ,वारा,ऊन, पाऊस अंगावर घेऊन प्रेमळ अंतकरणाची कृतज्ञतेची भावना व्यक्त करणाऱ्या माणसांची चित्तरकथा आहे.
'माझा भारत ' या पुस्तकात देशाचा इतिहास भूगोल आणि इंग्रज राजवटीची माहिती नसून निसर्गसंपन्न जंगलातील पशुपाखरे आणि त्याच्या अवतीभवती राहणाऱ्या खेड्यातील माणसांची चित्तरकथा मांडली आहे.या प्रदेशात
लेखकाचे बालपण गेले असून तेच त्यांचे कार्य क्षेत्र आहे.
ग्रामीण जीवनातील जीवनपद्धती आणि साध्या-भोळ्या सरळ लोकांच्या चाली रीतींचे ,स्वभावगुणांचे वास्तव रेखाटन केले आहे.त्यांच्या सानिध्यात तब्बल ७० वर्षे घालविलेल्या काळातील ठळकपणे दृष्टीस पडलेल्या माणसांची व्यक्ती चित्रणं आहेत
सुप्रसिद्ध शिकारी जिम कॉर्बेट यांच्या 'माय इंडिया'या मूळ पुस्तकाच्या 'मेरा भारत' अनुवादक प्रा.वेदकुमार वेदालंकार या हिंदी अनुवादावर आधारित कादंबरीचे संपादन शंकर सारडा यांनी केले आहे.
सुरस,आणि कुतूहल वाढविणाऱ्या कथा सुंदर शब्दात रेखाटल्या आहेत.कालीढूंगी, नैनीताल आणि मोकामा घाट या परिसरातील व्यक्तींची स्वभाववैशिष्ठ्ये कथा स्वरुपातील मांडली आहेत.जंगलातील 'वाघा ' च्या शिकारीचे चित्तथरारक वर्णने केलेली आहेत.त्यामुळे परिसराची सुक्ष्मपणे यथोचित समग्र माहिती समजते.बारा कथांमधून जंगल आणि व्यक्तींची स्वभाववैशिष्ठ्ये रेखाटली आहेत.
'गावची राणी 'कथेत लेखक शेतात घुसलेल्या वाघाचा माग काढत जंगलात जाऊन परत खेड्यात गावच्या पाटलाच्या घरी येतात.तेव्हा गाव पाटलीन राणीच्या पेहराव आणि स्वभावाचे वर्णन ग्राम्यबोलीत केले आहे.तसेच खेड्यातील दुकानदार आणि विक्रेते यांचे संवाद सुक्ष्मपणे शब्दबध्द केले आहेत.'शिकार करण्यात तरबेज असणारा कुॅंवरसिंह याचे व्यक्तीचित्र आशयघन भाषेत रंगविले आहे.त्याचे आजारपणातील प्रसंग वाचताना आपणही भावनिक होतो.
वाघाची डरकाळी ऐकूण घाबरलेला हरिसिंग आणि झाडावर चढून बसलेला जिम,या प्रसंगाचे वर्णन रोमांचक वाटतात.
'मोती,शेरसिंह आणि पुनवा'यांची व्यक्तिचित्रे आणि वाघाशी झटापटीची कथा रोमहर्षक आहे.सर फ्रेडरिक अॅंडरसन यांची तराई आणि भाबड क्षेत्रात दौऱ्यावर आले होते.तेव्हा ते न्यायदानाचे कामकाज चालवित असत.लोकांच्या जमावा समोर ते दिवाणी फौजदारी खटले चालवित असत.वादी प्रतिवादी आणि साक्षीदारांची बाजू ऐकून निरपेक्षपणे न्याय देत असत.
'जंगलचा कायदा 'या कथेत हरक्वार आणि कुंती या दोघांच्या परिस्थितीचे, मोलमजुरी आणि संघर्षपद जीवनाचा उलगडा केला आहे.आपल्या लहानग्या पुनवा आणि पुतळी खेळता खेळता जंगलात जातात.तेव्हा हे दोघं बाजारात गेलेले असतात.आल्यावर मुलांची शोधाशोध करतात पण कुठेच मुलं सापडत नाहीत.म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करतात. ते मुलांना शोधायला अक्षरशः दोन दिवस ४०-५० किलोमीटर अंतर तुडवत जातात.पण तान्हुली मुलं दृष्टीस न पडल्याने व्याकुळ झालेले असतात.तीन दिवसांनी जंगलात गुरे चारणाऱ्या गुराख्याला एका खड्डयात दोन मुले पहुडलेली दिसतात.त्यांना कडेवर घेऊन तो येतो.तहानुल्या बाळांना बघताच व्याकुळ कुंती मुलांना छातीशी कवटाळून घेते.तिच्या डोळ्यात आनंदाश्रू ओसंडून वाहतात.सगळे त्या गुराख्याचे कौतुक करतात.त्याला बक्षिसी देऊ करतात.पण तो उदार अंतःकरणाने नाकारतो आणि म्हणतो,'माझे तुम्ही कौतुक केले,मोठ्यांचे आशीर्वाद मिळाले.हेच मोठे धन मला मिळाले.मला काही नको.'भावनिक कथेतून उदार आणि सचोटीने काम करणा-या व्यक्तींचे भेट घडते.
"कालाढूंगी" येथील लेखकांचा बंगला म्हणजे समस्त जनवासियांचे हक्काचे दातृत्वाचे मदतघर होय.घरातील अनेकविध लोकांवर औषधोपचार केला होता.मदतीचा हात दिला होता.सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेला बंगला.
त्यामुळं अनेकांचे मुक्तद्वार होते.'नरवाची अग्नीपरिक्षा'या कथेत धाडस, शौर्य आणि साहस दाखविणाऱ्या नरवा आणि हरिया या दोन भावांची कथा आहे.'रिंगल 'नावाच्या बांबू (कळक)तोडण्याचं परमिट वनरक्षकाकडून आणण्यासाठी चालत १२ किमीवरील गावात चालत निघाले. बोर नदीच्या किनाऱ्यावरील पायवाटेने दोघेजण निघाले होते.हरिया पुढे तर नरवा अंगाव चादर घेऊन गवतातली वाट तुडवत असतात..उंच गवतातून जाताना अचानक वाघाचंं गुरगुरणं आणि नरवाची किंकाळी हरियाच्या कानावर येते.तो त्वरेने मागे वळून पहातोतर काय,नरवाच्या उरावर पंजे टाकलेला वाघ दिसतो.झटकन हरिया नरवाचे पाय धरुन अक्षरशः त्याला ओढतच सोडवून घेतो आणि तात्काळ नलनी गावात घेऊन येतो.त्याला कधी धरत तर कधी ओढत आणतो.ही थरारक कथा वाचताना अक्षरशः मन हेलावून गेले.अप्रतिम वर्णन लेखकाने केले आहे.
' रॉबीनहूड सुलताना'एका देरोखेडोर डाकू आणि पोलीस यांच्यातील कथा,निष्ठा रेल्वे ठेकेदारीची रंजक कथा,बुध्दू ,
लालाजी आणि चमारी याही कथा रोमहर्षक प्रसंगाने भरलेल्या आहेत.तर वाघाची शिकार करणाऱ्या जिम कॉर्बेट लेखकाने मोकामा घाटातील आठवणी शब्दातून ठळक केलेल्या आहेत.वेगळ्याच शैलीत जंगलपरिसरातील साहसी, दिलदार ,साध्याभोळ्या व्यक्तींची स्वभाववैशिष्ठ्ये रेखाटली आहेत.
@श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
Comments
Post a Comment