काव्य पुष्प-२२० आपण काय करतोय ?


   आपण काय करतोय ?


आपल्या आज्या पंज्यानी वाढवलेल्या झाडांची फळे आपण चाखतोय

पुढच्या पिढीला आपण काय देतोय 

झाडं लावून संवर्धन करतोय ||


आज्या पंज्यानी कमावलेल्या

शेतीभातीचा हकदार होतोय

वाडवडिलांनी फुलविलेला मळा 

आपण राखण्याचं काम करतोय ||


दिवसरात अन्नदाते कष्ट करतायत

काहीजण शिवारमळे फुलवतायत

नवतंत्राचा अवलंब करतायत 

शेतीची उत्पादकता वाढवतायत ||


वाडवडीलांनी बांधलेल्या वाड्याची

आपण मात्र वाटणी करतोय 

वेगळी चूल मांडून सुख मिळण्याचा 

आपण मात्र फुकाचा भाव खातोय ||


भुतकाळाची पानं चाळताना

दिमाखदार मानमरातब आठवतोय

पूर्वजांच्या कर्तृत्व पुण्याईवर 

आपण मात्र मस्तपैकी जगतोय||


खेडी गावं ओस पडू लागली 

आपण शहराकडे धावतोय 

लग्न मयती यात्रेखेत्रेला 

गावाला धावपळीत जातोय ||


साठवणीतल्या आठवणी

उगाळत विवंचनेत बसतोय 

मातीचा ऋणानुबंध जपायला

कधीतरी  शेताकडे जातोय ||


काव्य पुष्प-२२०
श्री रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड