४७|पुस्तक परिचय,सूत्र संचालन कसे करावे?
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚
४७|पुस्तक परिचय
सूत्र संचालन कसे करावे?
लेखक-के.आर.पाटील
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
यांत्रिक युगात माणसातला संवाद हरवत चाललाय.
पारावरच्या गप्पांची जागा टी.व्ही.मोबाईलने घेतलीय.
सुखदु:खाची भावना 'हॅलो-हाय'च्या आधुनिक संस्कृतीत वाऱ्यावर विरतेय,पण एकमात्र निश्र्चित सूत्रसंचालनाच्या क्षेत्रात रसिक श्रोत्यांच्या मनात आठवण कायम राहतेय…
….सूत्रसंचालन,निवेदक संधी म्हणून बोलायचा सराव होताच,नवनवीन बोलण्याची भावना निर्माण झाली की या क्षेत्रात आत्मविश्वास निर्माण होतो.अशा शब्दांच्या व्यासपीठावर 'सूत्र संचालन कसे करावे?'या पुस्तकाचे लेखन माध्यमिक शिक्षक के.आर.पाटील यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या विचारपीठाचे सौंदर्य आणि यशस्विता उठावदारपणेअधोरेखित होण्यासाठी या पुस्तकाचा अत्यंत चांगला उपयोग होईल असे माझे मत आहे.कार्यक्रमाचे यश हे कार्यक्रमाच्या संयोजनावर अवलंबून असते.पण संयोजकांत एकसूत्रता नसेल तर त्या कार्यक्रमाचा बेरंग होतो.यास्तव सूत्रसंचालक नियोजनबद्ध पद्धतीने आखणी करूनकार्यक्रम यशस्वी करतो.यासाठी नेमके नियोजन कसे करावे याची तपशीलवार माहिती या पुस्तकात दिली आहे.
या पुस्तकाच्या अंतरंगात सहा प्रकरणे आहेत.पहिले प्रकरण सूत्रसंचालन म्हणजे काय?,पूर्व तयारी कशी करावी?,सूत्रसंचालन कसे करावे? आकृतीच्या यशाची स्विकृती, पंचसूत्री आणि काही बोलके अनुभव.शेवटी बोलताना साखरपेरणीसाठी काव्य,चारोळी,निवडक वेचे आणि सुविचार संकलन दिलेले आहे.सहज सोप्या शैलीत प्रकरणातील उपघटकांचे विवेचन केले आहे.गरजेच्या जागी चारोळी आणि तक्ते दिले आहेत.ही कला अवगत करण्यासाठी या पुस्तकाचा पूरक माहितीसाठी आवश्यक उपयोग होईल.सूत्रसंचालकाची ओळख त्याच्या आवाजाने होते.त्याचा आवाज हाच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा साज.
आकर्षक मधूर भाषाशैली,काव्य रचना,शेरोशायरी आणि सुभाषितांचा उपयोग गरजेनुसार करावा.स्पष्ट उच्चार,समय सुचकता,शब्दफेक,शब्दांवर प्रभुत्व,छोटी वाक्य रचना आणि आवाजात चढउतार असणं आवश्यक असते.रसिकता,
आत्मविश्वास,दूरदृष्टी,वाचन संग्रह आणि संवाद कला सूत्रसंचालकास अवगत असेल तर हे ही क्षेत्रात उठावदारपणे काम करता येते.
तुम्हाला सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची माहिती असेल अनपेक्षितपणे बोलण्याची वा सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली तर काय करायचे याचे थोडक्यात टीप दिली आहे. शांतपणे कार्यक्रमाची रूपरेषा लक्षात घ्या. ज्या गोष्टी आपल्या जवळ नाहीत त्या गोष्टींवर विचार करण्यापेक्षा जे आहे अशाच माहितीवर व्यक्त व्हा. गोंधळून जाण्यापेक्षा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवा. अशावेळी पाठीशी असणारा अनुभव लक्षात घ्या. निर्णय क्षमतेची कसोटी ओळखायला शिका. सकारात्मक विचार मनात ठेवा. आलेली संधी दवडू नका .अधिक बोलण्यापेक्षा कमी बोला पण सर्वांच्या लक्षात राहील असेच बोला. मला जमतय का? या गोष्टीचा विचार मनातून काढून टाका. प्रत्येक माणसात एक निवेदन दडलेला असतो याची खूणगाठ मनाशी बांधा.स्वत:ला व्यक्त करुन संधीचं यशात रुपांतर करा.
सूत्रसंचालकाने संधीचे संवादरुपाने चैतन्याचे चांदणं फुलवायला खालील बाबींचा समावेश करुन पूर्वतयारी केली की तुमचा कार्यक्रम यशस्वी होईलच. कार्यक्रमाचा आराखडा तयार करावा.निमंत्रणपत्रिकेवरुन कार्यक्रम पत्रिका तयार करा.कार्यक्रम प्रसंगानुरुप आवश्यक टिपणे सोबत ठेवा.नवे विचार स्वीकारा. विविध ग्रंथ वाचण्यातून टिपणे काढा. विषयानुरूप तयारी करा.बोलताना अतिशयोक्ती टाळा. संवाद कौशल्य वाढवा. इतरांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या.वेळेचे भान सांभाळाआवाजाची खात्री करून घ्या. दाखले उदाहरणे व संदर्भ देताना खात्री करूनच त्याची पेरणी करा.मान्यवर उपस्थितांची स्वतःजवळ नोंद घ्यावी. आवश्यक व नेमके तेच बोला. सत्कार आणि स्वागत समारंभ या प्रसंगी शब्द सौंदर्य कोणते वापरावे याचेही भान ठेवा. कार्यक्रमात ऐनवेळी येणाऱ्या सूचनांची तत्काळ दखल घ्यावी.व्यासपिठावर मान्यवरांच्या मनोगताकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. विविध मान्यवरांच्या मनोगतातून व्यक्त होणाऱ्या ठळक मुद्द्यांची नोंद घ्या. विचारपिठाच्या कक्षेतच नेहमी राहा.अशी उत्कृष्ट निवेदक होण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती या पुस्तकात उपलब्ध आहे.अशी पुस्तके निवेदनकारास संग्राह्य असणं आवश्यक आहे.
परिचय कर्ता-रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
📚पुस्तकाचे नांव-सूत्र संचालन कसे करावे?
लेखक-के.आर.पाटील
प्रकाशन-ज्ञानसंवर्धन प्रकाशन, कोल्हापूर
आवृत्ती-जानेवारी २०१४/प्रथमावृत्ती
पृष्ठे-११०
मूल्य-५०₹
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
या मार्गदर्शक पुस्तकाची तथा परिचयाची गरज होती.
ReplyDelete