२४|पुस्तक परिचय , आयुष्याचे धडे गिरवताना
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚
२५|पुस्तक परिचय
आयुष्याचे धडे गिरवताना
लेखिका- सुधा मूर्ती
अनुवाद-लीना सोहोनी
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपल्याला विविध प्रकारच्या व्यक्ती भेटतात.अनेक घटना -प्रसंगांना सामोरे जावे लागते.त्यातुन बरेवाईट अनुभव येतात.
काही व्यक्तिंचे अनुभव मनात घर करतात,त्यातील काही व्यक्ती चमत्कारिक तर काही मन थक्क करणाऱ्या आहेत.या व्यक्तींमुळे आपणाला खूप काही शिकायला मिळते.आपल्यात परिवर्तन घडवून समृद्ध आणि परिपक्व बनवतात.अशाच स्मृतीतील लोकविलक्षण बिरुदावली असलेल्या प्रत्यक्ष लेखिकेल्या भेटलेल्या,परिचित व सहवासातील व्यक्तींचे रेखाटन,"आयुष्याचे धडे गिरवताना" या कथासंग्रहात विख्यात लोकप्रिय सामाजिक कार्यकर्त्या आणि सिध्दहस्त लेखिका आणि संगणक अभियंत्या आदरणीय सुधा मूर्ती यांनी २३ वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा रेखाटल्या आहेत.या पुस्तकाचे मराठीत अनुवादन लीना सोहोनी यांनी केले आहे.
२००६ साली "पद्मश्री" पुरस्काराने सन्मानित झालेल्या विख्यात सामाजिक कार्यकर्त्या 'इन्फोन्सिस फाउंडेशन'च्या अध्यक्षा, प्रसिध्द लेखिका यांनी सामाजिक कार्यासाठी भारतभर प्रवास केला.अनेक गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी स्वत: अथवा संस्थेच्या माध्यमातून अर्थस्वरुपात त्यांनी मदत केली आहे.गोरगरिबांना आपत्तीजनक परिस्थिती नुसार मदत केली.खेड्यातील जीवन अतिशय जवळून पाहिले आहे.त्यांच्या बालपण, कॉलेज जीवन,नोकरी आणि जगभरातील प्रवासातील अनेक माणसांच्या जीवनाचे दर्शन घडले.
अलौकिक सामाजिक सेवा आणि असामान्य साहित्य सेवेतील योगदानाबद्दल त्यांना भारतातील सहा विद्यापीठांनी 'डॉक्टरेटस' पदवी देऊन सन्मानित केले आहे.त्यांची लोकप्रिय आणि वाचकप्रिय साहित्यसंपदा आहे.सुकेशिनी, त्रिशंकू,गोष्टी माणसांच्या, वाइज अॅण्ड अदरवाइज, पुण्यभूमी भारत,बकुळा,आजीच्या पोतडीतल्या गोष्टी,सामान्यांतले असामान्य आदी लोकप्रिय अक्षरशिल्पे आहेत. 'आयुष्याचे धडे गिरवताना'त्यांनी स्वानुभवांना आणि व्यक्तिरेखांना कथारुप दिले आहे.आपल्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तीरेखा वाचताना प्रत्ययास येतात.सहज सोप्या भाषेत,लेखन शैलीतून या कथा रसिक वाचकांना 'आयुष्याचे धडे' देतात.प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तींचे रेखाटन या पुस्तकात केले आहे.
घरातल्या जाचाला कंटाळून रेल्वेने विनातिकीट कुठं जायचं होतं, तेही माहित नसणारी'चित्रा' लेखिकेला बॉम्बे ते बंगळुरू या ट्रेनमधून प्रवास करताना तिकिटचेकर बाकड्याच्या खाली असणाऱ्या मुलीचं तिकिट विचारतो, तेव्हा लेखिकेला समजतं की आपल्या बाकाच्या खाली एक भेदरलेली मुलगी प्रवास करतेय.त्यावेळी तिचं लेखिका संपूर्ण तिकीट काढतात.दिला जेवणाचा डबा देतात.पण ती काही बोलत नाही.तीच चित्रा शिकून परदेशी गेल्यावर लेखिकेच्या हॉटेलचे बील पेड करते.तेव्हा लेखिका विचारते,'तु माझे बील का भरलेस.'तेव्हा चित्राला रडू कोसळते.ती लेखिकेला मिठी मारुन म्हणते,'मॅडम, तुम्ही माझे त्यावेळी तिकीट काढले नसते तर माझ्यावर कितीतरी संकटं ओढावली असती.पण तुमच्यामुळे माझं आयुष्य बदललं.तुम्ही दिलेल्या बंगळूरू अनाथालयातील आसऱ्याने मला जगण्याची संधी मिळाली.'तेव्हा मॅडम म्हणतात,'चित्रा, तू आत्मविश्वासाने पाऊल टाकून शिक्षित होऊन स्वता:च्या पायावर स्थिर होऊन परदेशात स्थिरावलीस.तुझ्या यशाच्या सोपानात मी फक्त एक पायरी होते.'अतिशय भावस्पर्शी व्यक्तिचित्रण चित्राचे रेखाटले आहे.
धर्मापलीकडे जाऊन आयबापापासून निराधार झालेल्या आपल्याच शेजारच्या' रहमान'ची बाल्यावस्थेपासून काळजी घेणारी सांभाळ करणारी 'अव्वा' म्हणजे माणुसकीच्या नात्याचे मुर्तिमंत उदाहरण आहे.ती अडाणी असून सुद्धा तिच्या श्रेष्ठ जीवनमूल्यांचे दर्शन घडते. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या दुष्काळग्रस्त भागातील खेड्यातली गंगा. दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून गोरगरिबांना मोफत अंघोळीला गरम पाणी देते.हृदयापासून मदत करते.त्यामुळं तिचं अंगण म्हणजे गंगाघाट नव्हे काय? तिचं तत्त्वज्ञान मॅडमला भावलं.ती म्हणाली'पैसा स्वत: सोबत अपेक्षा घेऊन आला की,समाजकार्याचा समतोल ढळतो.'उपवास 'कथेत खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या लहान बाळाच्या दुधासाठी किती दिव्य करावी लागतात.त्यातच घरी आलेल्या पाहुण्याचे आदरातिथ्य करायचे म्हणजे तर जीव मेटाकुटीला येतो.अशा परिस्थितील उरिया भाषेतील पती-पत्नीचा संवाद कानावर पडल्यावर मॅडम त्यादिवशी 'उपवास' आहे म्हणून दुभाषिकाला सांगायला लावतात.या कथेचं वर्णन भावस्पर्शी शैलीत केले आहे.वाचताना आपणही भावनिक होतो.
विश्वास,प्रामाणिकपणा,सचोटी ,मदतीबद्दल संवेदनशीलता आदी स्वभावांच्या व्यक्तिंचे चित्रण वास्तव व परखडपणे मांडले आहे.गोरगरिबांना भाजीपाला मोफत मिळावा म्हणून ग्रामपंचायतीच्या जागेत स्वकष्टाने निरपेक्षपणे मळा फुलविणारा पराप्पा.इंग्रजांना दुधदुभते देऊन साठलेल्या पैश्यातून गावासाठी इंग्रजांकडून तलाव बांधून घेणारी 'अम्मा'.तिच्या कृतीतून आपणास उच्चविचारांचे यथार्थ दर्शन घडते.मदत मिळाल्याचं आयुष्यभर ओझं वाढवणारा गोपाल.आयुष्यात यश, पुरस्कार,पदव्या आणि पैश्यापेक्षा उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करत सहानुभूती,सहवेदना
आणि मन:शांती यालाच महत्त्व द्यायला लावणारी ही सर्व व्यक्तीचित्रणं वाटतात.
कामाचा आनंद हाच माणसाच्या जीवनातील सर्वोच्च पुरस्कार आहे.असं डॉक्टर राज रेड्डी सांगतात.'आयुष्याचे धडे गिरवताना' यातील व्यक्तींचे अनुभव आपल्याला बरंच काही शिकवून जातात आणि विचार मंथन करायला लावतात.पूर्वजांबद्दल सहृदयता दाखविणारं माणसं आपणास 'त्याग 'कथेत भेटतात.मॅडमनी या कथेतील व्यक्तींना शिक्षणासाठी केलेल्या मदती वेळचा अनुभव आणि अनपेक्षितपणे कालांतराने भेटलेल्या त्याच व्यक्तींचं वागणं याचं वर्णन वाचताना आपल्याला विचार करायला भाग पाडते.लेखिका मॅडम यांनी सुद्धा या व्यक्तिरेखांतून 'आयुष्याचे धडे' कसे गिरवले हे सोदाहरण कथेतून स्पष्टपणे व्यक्त होतात.उत्तम लेखनीला उत्तम वाचायला येईलच असे नाही.उणीवा पैश्याने भरुन काढता येत नाहीत.परिस्थितीचा फायदा घेणारे टपून बसलेले असतात.आपण जतन केलेल्या वस्तूंचे पुढील पिढीला ओझं वाटू लागते.अंतकोपी हेतू ठेवून वागणारे लोक असतात.स्वत:च्या तत्वासाठी लढतं राहणं.
मदतीच्या अपेक्षा प्रत्येकाला असते. करुणा सागर असणाऱ्या थोर महात्म्यांचे कार्य अलौकिक असल्याने ते जागतिक होतात.अशा सुंदर शब्दातील सहजसुंदर कथेचा रसास्वाद घेताना आनंद मिळतो.त्यातील व्यक्ती आपणाला भावतात.अप्रतिम रसिकांना वाचायला निश्चितच आवडेल.
@वाचक श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
Comments
Post a Comment