३०|पुस्तक परिचय ,सुख


वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
 पुस्तक क्रमांक-३१
 पुस्तकाचे नांव--सुख The Experience…
 लेखकाचे नांव--गणेश आ.शिंदे
प्रकाशक-ओंकार प्रकाशन, अहमदनगर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-नोव्हेंबर २०११/सहावी
एकूण पृष्ठ संख्या-६१
वाङमय प्रकार ( कथा,कादंबरी,ललित ई. )--ललित
मूल्य--८०₹


📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚

३१|पुस्तक परिचय

         सुख The Experience…

लेखक-गणेश आ.शिंदे

 🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

    "सारासार विचारेल जीवन सुगंध भवेत्,

     सम्पदा सुविचारेन कुविचारेण ह्यापदा|"

खरं-खोटं, बरे-वाईटाचा पूर्ण विचार करूनच जो व्यवहारात शहाणपणाने लागतो.त्याचे जीवन खरं सुखी होते.सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते.तथा कुविचाराने नाना प्रकारच्या विपत्ती व आपत्ती संकटे येतात.सुखी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते.अशावेळी आपली सद्सदविवेकबुध्दी वापरून आयुष्य घालवावे लागते.'सुख'हे ललितलेखनाचे पुस्तक प्रख्यात युवा व्याख्याते गणेश शिंदे यांनी 'सुख'या विषयावर चिंतनशील विचार व्यक्त केले आहेत.मनुष्यजीवनातील सर्वात आल्हाद दायक संकल्पना म्हणजे सुख होय.प्रत्येकजण जीवाचे रान करून सुखासाठी अहोरात्र धडपडत असतो.सुखाचा नेमका अर्थ उमजत नाही,समजत नाही.याच सुखाचा शोधाविषयी विचार उदाहरणं, दाखले, गोष्टीतून  उलगडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.आवश्यक तिथे श्र्लोक आणि वेचे देऊन अर्थाचे प्रकटीकरण केले आहे.

   'सुख…..म्हणता म्हणता आयुष्य चुटकी सरशी संपून जाते,

पण नेमकं सुख कशाला म्हणायचं हेच समजत नाही…' सहजपणे सोप्या पद्धतीने सुखाविषयीचे विचार स्पष्ट केलेत.

छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेता आला तर आपल्याला सुखानंद आयुष्य कसं जगायचं उमजलं. म्हणूनच ''नको त्या गोष्टीचं दु:ख मानायचं आणि अपेक्षांचं ओझं खांद्यावर मिरवत आयुष्याचं रडगाणं गायचं…..यापेक्षा आहे त्या गोष्टीत समाधानी राहून अपेक्षांच्या पुर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न यातच सुखी जीवनाचं रहस्य दडलंय….''

''अमृत घट भरले तुझ्या घरी…

का वन वन फिरशी बाजारी…."प्रख्यात कवी बा.भ.बोरकरांनी सुखाच्या शोधात भटकणाऱ्या छंदिष्ट लोकांना प्रश्न विचारुन सुखाचे ठिकाण दाखवले आहे.वरील उक्तीप्रमाणे सुख आपल्या जवळच आहे.याची जाणीव करून दिली आहे.ते आत्मविश्वासाने ओळखून आनंदानुभव घेणं म्हणजेच सुखासमाधानाने जगणं होय.

या अक्षरशिल्पातील लघूलेखातून सुख म्हणजे काय? पटवून देण्याचा प्रयत्न लेखक गणेश शिंदे यांनी ओघवत्या शैलीत शब्दबध्द केला आहे. यातील अनेक परिच्छेद वाचनीय व संकलित करून जतन करण्यासारखे आहेत.वैचारीक मूल्य संस्कार व संस्करण करायला लावणारे आहेत. प्रत्येक मनुष्य सुखासाठी धडपड करीत असतो आणि याच सुखाच्या धडपडीतच्या प्रत्येकाच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात. सुख मिळवण्याचे मार्ग विविध असतात आणि मिळवलेले सुख उपभोगण्याची ताकद सुद्धा तुमच्याजवळ असणं महत्त्वाचं नाहीतर म्हणतात ना,'सिर सलामत तो पगडी पचास'. तुमचे शरीर मजबूत असले पाहिजे आणि उत्तम शरीरात मन सुद्धा प्रसन्न असते.अशा वातावरणात सुखाला काही तोटा. शरीर आणि मन या सुखाच्या आड येणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून प्रथम शरीर व मनाचा विचार होणं महत्त्वाचं असतं. शरीर निरोगी असेल तर निरोगी शरीरात प्रसन्न मन वास करीत असते.म्हणून शरीराकडे लक्ष देणे म्हणजे मल्ल बनणं नसून शरीर निरोगी असावे.यासाठी योग्य व्यायाम, प्राणायाम, योग्य आहार यांचा आधार घेऊन शरीर निरोगी बनवा, तरच मन सुद्धा उत्तम राहील.शरीराबरोबर उत्तम मन असल्यास सुख प्राप्त होते.

सुख आणि दुःख या संकल्पना प्रत्यक्षात जरी कृती आणि शब्दांवर आधारित वाटत असतील तरी बऱ्याचदा कृतीला आणिओठातून बाहेर पडणाऱ्या शब्दाला आपल्याच विचारांची गुंफण असते.हे विसरता येत नाही.नाहीतर कृती करण्यापूर्वी अंतरंगात अनेक विचारांचे वादळ घोंघावते.

आपला गोंधळून जातो.त्यामुळे सुचेनासे होते.कृती चांगली झाली तर सुख आणि विकृत झाली तर दु:ख पदरात पडते.दु:खी क्षणाला कवटाळून बसण्यापेक्षा आनंदाचे क्षण अनुभवा.आठवण व विस्मरण हे मानवाला मिळालेले वरदान आहे.कोणत्याच क्षणांना थांबविणे आपल्या हाती नसते.

आयुष्यातील आनंदी क्षण आठवा.काहींच्या आठवणीने सुख मिळते.तर काही गोष्टी विसरण्यात सुख असते.

प्रेमाला उपमा नाही!प्रेम हे भारतीय आणि श्रध्देचीच रुपे आहेत.जनाबाईच्या प्रेमापोटी भगवंत धावून आला.तिच्या घरचं दळण दळलं.सुळाचं पाणी झालं.अर्जुनाच्या प्रेमामुळेच श्रीकृष्णाने रथाचं सारथ्य केले.तुकारामाच्या भक्तीपुढे इंद्रायणीने गाथा परत केल्या.माऊलींच्या श्रध्देने निर्जीव भिंतही चालली.स्वातंत्र्याच्या प्रेमापोटी भगतसिंग हसत हसत फासावर चढला.हजारदा घर तुटलं तरी चिमणी एक एक काडी जमवून चिमणी पिलांसाठी घरटं उभारते.

जीवन हे खूप सुंदर आहे.ते कसं जगायचं? कुठे? कोणासाठी? कशासाठी?हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.

पण आपण जे जगतो तेच आपल्या सुखदुःखाचे कारण असते.बहुजण समाजाची मुले शिकावीत म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील आण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना उदात्त हेतूने केली.तो शैक्षणिक क्षेत्रात दीपस्तंभ ठरला आहे.

अनेक खडतर अडीअडचणींना संकटांना सामोरे जाऊन,

आव्हानांना सामोरे जाऊन संस्थेला नावारुपाला आणले.

आचरणात कर्मवीर ठरले.संकटरुपी दु:खाच्या वावटळीनंतर सुखाची लहर निर्माण करण्याचे सामर्थ्य फक्त नैतिकतेतच असते.यातील सर्वच लेख वैचारिक शिदोरी आहेत.

✒️परिचयकर्ता- श्री रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई


🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड