काव्य पुष्प-२२४ निवडणूक चारोळी
इलेक्शनचा लेखाजोखा
तुम्ही कितीही लावा शक्ती
तुम्ही कितीही लढवा युक्ती
मतदार जनता हीच शक्ती
मतदारांची करत रहा भक्ती
अशी झुंज असा मैत्रीचा लढा
विजयाचा वाजे सनईचौघडा
तुम्ही कितीही करा पत्रकांचा हल्ला
लय मजबूत हाय हा बालेकिल्ला
कुणाचे बालेकिल्ले ढासळले
कुणाचे बुरुज गढी कोसळले
कुणाचे गडकोट उध्वस्त झाले
कुणाच्या आरक्षणावर गंडांतर आले
कोणाला काठावर बहुमत मिळाले
कोण कोण काठावर पास झाले
कुणाला निसटतं बहुमत मिळाले
कुणाला भावबंदकीनं तारले
कुठे सत्ताबदल झाला
कोणाचा गडकोट आला
तर कोणाचा सिंह पडला
तर कुणाचा चंचूप्रवेश झाला
कुणी कुणाचा हिशोब चुकता केला
तर कुणाचा एकमताने विजय झाला
तर कुणाचा चिठ्ठीवर विजय झाला
तर कुणी कुणाचा वचपा काढला
एकाचा पराजय दुसऱ्याचा विजय
सत्तेच्या सारीपटात विकासाचा जय
बरेचसे सत्तेचे गडकोट सदैव अजय
विरोधकांचा सतत होतोय पराजय
सत्तेच्या चाव्या कुणाच्या ताब्यात
वारेमाप पैश्यांचा चुराडा करतात
पदांची बोली लावून पदे मिळवतात
एकहाती गावात बिनविरोध करतात
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment