२७|पुस्तक परिचय, मुलांचे मेडिकल जनरल नॉलेज
वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-२८
पुस्तकाचे नांव--मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज
लेखकाचे नांव--डॉक्टर जगन्नाथ दीक्षित व डॉक्टर अंजली दीक्षित
प्रकाशक-मनोविकास प्रकाशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-ऑगस्ट २०१२/आठवी आवृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-७८
वाङमय प्रकार ( कथा,कादंबरी,ललित ई.)--ललित
मूल्य--७०₹
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚
२८|पुस्तक परिचय
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज
लेखक-डॉक्टर जगन्नाथ दीक्षित व डॉक्टर अंजली दीक्षित
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
सर्व सामान्य मुलांना विज्ञान व वैद्यक शास्त्राविषयी विलक्षण कुतूहल असतं.आपल्या दैनिक शरीरातील क्रियाअंतरक्रिया कशा घडतात.आजारी पडलो की औषधोपचार का करावा लागतो.डॉक्टर आजारांचे निदान कसं करतात.याचं अनेक प्रश्न मुलांप्रमाणेच सामान्य जणांना पडत असतात. हल्ली वैद्यकीय ज्ञान सहजगत्या मराठीत उपलब्ध होत नाही.या सर्वांची उकल प्रश्र्नोत्तरांच्या स्वरुपात "मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज"या नावातच आशय असणाऱ्या पुस्तकाचे लेखन डॉक्टर जगन्नाथ दीक्षित व डॉक्टर अंजली दीक्षित या द्वयींनी केलयं. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या माजी कुलगुरू डॉक्टर मृदुला फडके यांची प्रस्तावना लाभली आहे.हे पुस्तक मुलांना आरोग्यविषयक ज्ञान समृद्ध होण्यास मदत करतील. लहानग्यांना मनातल्या जिज्ञासापूर्ण प्रश्र्नांची उकल होईल.मुलांची आकलनशक्ती प्रगल्भ होऊन आणखी मूलभूत प्रश्न तयार होतील.
आपल्याकडे साधी सायकल वा मोटार सायकल असली तरी तिच्या कार्यप्रणालीची आणि जुजबी दुरुस्तीचे कामचलाऊ ज्ञान आपल्याला असते. ते जर नसेल तर प्रसंगी आपली फटफजिती होते वेळ पैसा याचा अपव्यय होऊन मनस्तापही होतो. तर मग आपल्या अमूल्य शरीराविषयी आपल्याला माहिती असायलाच पाहिजेत.अत्यंत गरीब अशिक्षित व्यक्ती दुखणे अगदी विकोपाला जाईपर्यंत डॉक्टरांना दाखवत नाही तर दुसऱ्या बाजूला श्रीमंत उच्चशिक्षित व्यक्ती सर्दी खोकल्यासाठीही तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा वेळ व स्वतःचा पैसा व्यर्थ वाया घालवत असतात. वैद्यकीय ज्ञानाच्या बाबतीत या दोहोंची जाणीव गुणात्मक दृष्ट्या एकाच पातळीवर आहे असे आपल्याला म्हणता येईल.
यास्तव सामान्यपणे शरीराची माहिती असणे महत्त्वाचे आहे.आरोग्यविषयक ज्ञान सर्वांना समजेल अशा भाषेत उपलब्ध केले आहे.आरोग्याची जबाबदारीचे दृष्टी निर्माण होईल.या पुस्तकाची संकल्पना अतिशय सुंदर आहे.
आरोग्यविषयी माहिती सामान्य जनतेपर्यंत मुलांपर्यंत पोहचविण्यासाठी या पुस्तकाची निश्र्चितच मदत होणार आहे.अनेक समज-गैरसमजांचा उलगडा वाचताना लक्षात येतो.प्रत्येक प्रश्र्नांचा उलगडा सहजपणे सोप्या भाषेत केला आहे.बऱ्याच आरोग्यविषयक समस्या विधानाची खरी माहिती कळते.गरजेप्रमाणे आवश्यक तिथल्या पानांवर चित्रे रेखाटली आहेत.
सर्व समस्यांवरील आरोग्याचे ज्ञान लोकांना समजेल अशा भाषेत उपलब्ध करून दिले आहेत.लोकांच्या आरोग्याच्या प्रश्र्नांची उत्तरे मांडली आहेत.गिरीश सहस्रबुद्धे यांनी रेखाटलेली चित्रे पुस्तकात आहेत.साधारणपणेशंभर एक प्रश्र्नांची उकल या पुस्तकातून होते.विशेषत: अन्नाचे पचन,उचकी, खोकला,निद्रा, लसीकरण, हृदयविकार,
अक्कलदाढ,उष्माघात ,रक्तदान,मधमाशीचे चावणं, रक्तदान कसे करतात, वटवाघूळ चावल्याने रेबीज होतो काय. केसांचा उपयोग,जळवात,गोवर वात दमा चक्कर म्हणजे काय ?लहान मुलांचे लसीकरण आदी प्रश्र्नांचे उत्तरे मिळतात.तसेच विद्यार्थी दशेतच आरोग्याचे बाळकडू मुलामुलींना मिळावे.आरोग्याच्या सवयींचा अंगीकार करावा.
सवयींचे भान जपण्यासाठी उपयुक्त पुस्तक आहे.
✒️श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
🌿📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚
Comments
Post a Comment