३९|पुस्तक परिचय, जादुई वास्तव
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚
३९|पुस्तक परिचय
द मॅजिक ऑफ रिअॅलिटी
जादूई वास्तव
लेखक- रिचर्ड डॉकिन्स
भावानुवाद-डॉक्टर शंतनु अभ्यंकर
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
जादूची रुपं अनेक.प्राचीन इजिप्तमधले लोक समजत की रात्र होते ती नट देवतेने सूर्यबिंब गिळल्यामुळे,व्हायकिंग जमात समजायची,की इंद्रधनुष्य म्हणजे स्वर्गलोकीच्या देवतांचा भूलोकी उतरण्याचा पूल होय.ह्या कथा जादुई,
सुरस आणि चमत्कारिक खास.आगळीवेगळी जादू आहे.ह्या प्रश्र्नांच्या खऱ्याखुऱ्या उत्तरांच्या पोटात दडलेली, शोधात दडलेली,विस्मयकारी वास्तवाची जादू.'जादूई वास्तव'या पुस्तकात डॉ.शंतनु अभ्यंकर यांनी खुमासदार शैलीत या सत्यतेचे लेखन केले आहे.
लेखक डॉक्टर शंतनु अभ्यंकर हे वैद्यकीय व्यावसायिक असून अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि लोकविज्ञान संघटनेत सक्रिय सहभागी आहेत.त्यांना लेखन, वाचन,नाटकं आणि प्रवास यांचा छंद जडला आहे.ललित लेखन, विज्ञान विषयावर मार्मिक भाष्यकार ,रसाळ भाषांतरकार,अभ्यासू वक्ते ब्लॉगर लेखक म्हणून ख्यातकीर्त आहेत.त्यांना ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेबद्दल२००७ साली महाराष्ट्राचा 'डॉक्टर आनंदीबाई जोशी'गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.
'सत्य हे कल्पितापेक्षाही अद्भुत असते,'हे पटवून देणाऱ्या विचारवंतांत, प्रतिभावान लेखक'रिचर्ड डॉकिन्स' यांनी लिहिलेल्या 'मॅजिक अॉफ रिअॅ लिटी'या ग्रंथांत वरील सत्यवचनाची उदाहरणे पानोपानी आढळतात.मूळ इंग्रजी भाषेतील ग्रंथांचा भावानुवाद डॉक्टर शंतनु अभ्यंकर यांनी विज्ञानाची आवड असणाऱ्या युवकांना आणि ज्यांना आवड नाही,अशा सर्वांना आवड निर्माण करण्यासाठी हा ग्रंथ बहुमोल आहे.'रिचर्ड डॉकिन्स' हे इंग्लंड मधील प्रख्यात लेखक आणि विज्ञान संशोधक आहेत.देव आणि धर्म कल्पनांचे कठोर टीकाकार आहेत.'दि गॉड -डेल्युजन'
हा जगभर गाजलेला त्यांचा ग्रंथ आहे.त्यांनी उत्क्रांती वादावर मूलगामी अभ्यास व संशोधन केले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंधश्रद्धा आणि बुवाबाजी विरोधात संघर्ष करीत सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत भरीव वैचारिक योगदान दिले आहे.विवेक वादावर संघर्ष आणि प्रबोधन करीत वैचारिक कार्य करीत असते.जगातल्या विविध भागात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादावर विपुल लेखन व चर्चा होत असते.विचारवंत त्यांचे विचार अभ्यासून पोटतिडकीने आणि तर्कसंगत पध्दतीने मांडत असतात.इंग्रजी भाषेत असणारे ज्ञान इंग्रजी न वाचणाऱ्या वाचकांपर्यंत हे विचार वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी अंनिसने प्रयत्न केला आहे.या प्रयोगातून ज्ञानाचे साचलेपण दूर होईल.मने चिंतनशील,नव्याने विचार करतील.चिकित्सक होऊन जीवनाला नवा आकार देतील.
विज्ञानाच्या सृष्टीबद्दल विस्मयकारी माहिती अद्भुत अनुभतीबरोबरच विज्ञानाच्या विचार पध्दतीवर इतकं भाष्य करणारं पुस्तक विरळा.म्हणून भावानुवाद केल्याचे डॉक्टर नमूद करतात.भाकडकथा, पुराणकथा,धार्मिक कथांची इथे भरपूर उदाहरणे आहेत.हे पुस्तक रंजक आणि उद्बोदक आहे
खुमासदार,रसाळ शैलीत लेखन केले आहे.या पुस्तकात निरिश्वरवादाचा आधुनिक उद् गाता रिचर्ड डॉकिन्स,वास्तव कोणतं आणि जादू कुठली?पहिला माणूस कसा तयार झाला? इतक्या प्रकारचे प्राणी निर्माण कसे झाले?हे विश्र्व बनलयं कशाचं?ऋतू वसंतादिक का येति-जाती,तैसेचि का होती दिन आणि राणी? सूर्य आहे तरी कसा? इंद्रधनुष्याचे रहस्य,या विश्र्वाची सुरुवात कशी झाली? कुणीतरी आहे का तिथे? भूकंप कशाने होतात?तो सुखकर्ता तर मग विघ्नाची का वार्ता? चमत्कार कशाला म्हणावे?आदी जादुई विषयांवरील लेख या पुस्तकात वैज्ञानिक दृष्टितून कारण मीमांसा केली आहे.मनाची उत्तम मशागत या पुस्तकाने घडेल असा विश्वास वाटतो.
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
पुस्तकाचे नांव- द मॅजिक ऑफ रिअॅलिटी
जादूई वास्तव
लेखक-रिचर्ड डॉकिन्स
भावानुवाद-डॉक्टर शंतनु अभ्यंकर
प्रकाशन-विवेक जागर संस्था, धुळे
आवृत्ती-प्रथमावृत्ती
पृष्ठ संख्या-२०८
मूल्य-२५०₹
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
Comments
Post a Comment