३१|पुस्तक परिचय, कर्मवीर भाऊराव पाटील





  कर्मवीर अण्णा, पद्मविभूषण सन्मानाने गौरविण्यात आलेले, महाराष्ट्रातील शिक्षण प्रसारक, समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील यांना जन्म दिनी विनम्र अभिवादन ❗


वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई पुस्तक क्रमांक- पुस्तकाचे नांव--कर्मवीर भाऊराव पाटील लेखकाचे नांव--प्रा.डॉ.रमेश जाधव प्रकाशक-साकेत प्रकाशन , औरंगाबाद प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०११/प्रथमावृत्ती एकूण पृष्ठ संख्या-२७२ वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी, ललित ई. )--चरित्रग्रंथ मूल्य--३००₹

-----------------------------------------------------------------

📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚

३५|पुस्तक परिचय

        कर्मवीर भाऊराव पाटील

     लेखक- प्रा.डॉ.रमेश जाधव 

 🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾



महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातील बहुजन समाजातील मुलांसाठी आणि गोरगरीब मागासवर्गीय वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी 'रयत शिक्षण संस्थेची स्थापना' करुन शिक्षणासाठी ज्ञानवृक्षाचे रोपण करणारे समाजसुधारक  पद्मभूषण पारितोषिक विजेते शिक्षणप्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांचे आत्मचरित्र लोकराजा शाहू छत्रपती या चरित्र ग्रंथाचे चरित्रकार, पटकथा लेखक प्रा.डॉ.रमेश जाधव लिखित " कर्मवीर भाऊराव पाटील" या ग्रंथात आण्णांचे चरित्र  सहजसुंदर शब्दात अभ्यासपूर्वक मांडले आहे.अनेक दुर्मिळग्रंथ,पुस्तके, मासिके, अंक, वर्तमानपत्रे आदी संदर्भ पूरक साहित्याचा चिकित्सकपणे अभ्यास करुन वाचकांना उपलब्ध करून दिले आहे.लिखित साधनांबरोबर संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून संवादातून मुलाखतीतून मौखिक माहिती संकलित केली.लालित्यपूर्ण,सत्यता आणि प्रमाण भूतता यांचे भान ठेवून आशयघन शब्दात चरित्रात्मक माहितीची गुंफण केली आहे.

         गोरगरीब मुलांना शिक्षण घेणे सुलभ व्हावे म्हणून'कमवा व शिकवा'योजनेतून श्रमाचा महामंत्र दिला.समता आणि बंधुतेची शिकवण संस्थेने चालविलेल्या वसतिगृहातून दिली.तिथं सर्व जाती धर्मातील मुलांना प्रवेश दिला जात असे.''छत्रपती शाहू वसतिगृह''चे नामकरण करताना महात्मा गांधींनी गौरवास्पद उद् गार काढले होते, ''भाऊराव,साबरमती आश्रमात मला जे शक्य झाले नाही ,ते या ठिकाणी करून दाखविण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात." राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांनी समाजसुधारणचे आणि शिक्षणप्रसाराचे कार्य निरपेक्षपणे केले.शिक्षणक्षेत्र हेच त्यांचे जीवनकार्य होते.

    कर्मवीर भाऊराव पाटील यांचे  जीवनचरित्र

 पवित्र ते कूळ, जन्म आणि बालपण,शाहू छत्रपतींच्या सहवासात जडणघडण, घराबाहेर, भयंकर दिव्य,रयत शिक्षण संस्थेची स्थापना, सत्यशोधन चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळ,श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस,रयत शिक्षण संस्थेची वाटचाल, महात्मा गांधीजींचा प्रभाव आणि अस्पृश्यता निवारण,तो अमर जाहला कर्मवीर जगतात आदी अकरा लेखमालिकेतून उलगडा केला आहे.पुस्तकात आवश्यकतेनुसार गरजेप्रमाणे चित्राकृती आहे.विविध घटना प्रसंगातील पडताळून पाहिलेली सत्यता लक्षात यावी म्हणून संदर्भ सूचीतील लिखीत तपशील पान क्रमांकासह दिलेला आहे.कर्मवीर भाऊराव आण्णांचे चरित्र लेखक करताना त्यांच्या सहवासात अनेक वर्षे प्रत्यक्ष काम केलेले गुरुवर्य प्राचार्य कणबरकर साहेब आणि एक महत्त्वाचे चरित्रकार प्राचार्य डॉ.रा.अ.कडीयाळ यांच्याशी खूप ‌वेळा केल्याचे नमूद केले आहे.चरित्रातील घटना तपासून घेतल्या.त्यामुळे

चरित्रात्मक ग्रंथाची वाटचाल अधिक 'विश्र्वसनीय चरित्र'होईल अशी खात्री वाटते.

या चरित्र ग्रंथातील मलपृष्ठावर सामाजिक चळवळीचे प्रणेते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे कर्मवीर भाऊराव पाटील आण्णा यांच्या विषयीच्या अलौकिक कार्याचा गौरव केला आहे.ते म्हणतात,"भाऊराव, तुम्ही खरे कर्मवीर आहात.तुम्ही नांगराचे रुमणे टाकले,हातात लेखणी घेतली;पण हूडपणात मोडून गेली.कळले ते तुम्हाला,कळल्यावर वळले म्हणजे झाले.तुमच्या आयुष्याचे भरकटणारे तारु किनाऱ्यावर लागले.सातारच्या शूर भूमीवर तुम्ही पाय रोवून उभे राहिलात

अठरापगड जातींची मुले गोळा केली आणि त्यांना 'अ'पासून 'ज्ञ'पर्यत तुम्ही स्वता:च पाठ देऊ लागलात.शून्यातून रयत शिक्षण संस्थेची सृष्टी निर्माण केली.

हिंदू समाजाने हजारों वर्षे सामाजिक व धार्मिक गुलामगिरीत ठेवले,ज्यांचे चित्त हिरावून घेतले, पिळून घेतले.तरीही ज्यांचे पित्त खवळले नाही.अशा मलूल झालेल्या अस्पृश्य बांधवांना माणुसकीचा हक्क मिळवून देण्यासाठी मी हयातभर झगडलो.शास्त्री पंडितांनी कड्या कुलूपात लपवून ठेवलेले ज्ञानाचे भांडार मी फोडले.

भाऊराव, तुम्ही महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्या धुंडाळल्या.

झोपड्या-झोपड्यांतून सापडलेले माणिकमोती गोळा करून आणलेत.आपणच आपल्या हयातीत लावलेल्या झाडाचे फळ खायचे भाग्य तुम्हास लाभले.केवढे तुम्ही भाग्यवान!धन्य ती सातारची भूमी आणि धन्य तिचे सुपुत्र!

     चरित्र लेखक प्राध्यापक डॉक्टर रमेश जाधव यांनी अतिशय तळमळीने आणि अभ्यासपूर्वक संशोधन करून या ग्रंथाची रचना केली आहे.रसिक वाचकांना कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षणाबरोबरच इतर अलौकीक बालपण,शिक्षण, सत्यशोधक कार्य, नोकरी,प्रपंच आणि सामाजिक कार्यातील विविधांगी पैलूंचे दर्शन घडते.

प्रबोधनात्मक मार्गदर्शक ग्रंथ आहे.संदर्मसूचीसह ग्रंथ परिपूर्ण केलेला आहे. अप्रतिम शब्दांकनाने चरित्र ग्रंथ रसिक वाचकांना उपलब्ध करून दिला आहे.


परिचयकर्ते-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड