३८|पुस्तक परिचय, शिक्षक संजीवनी



वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई

 पुस्तक क्रमांक-३८

 पुस्तकाचे नांव--शिक्षक संजीवनी

 लेखकाचे नांव--ना.वि.कुंभार

प्रकाशक-विमल प्रकाशन, पुणे

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-फेब्रुवारी २००४ /प्रथमावृत्ती

एकूण पृष्ठ संख्या-१८०

वाङमय प्रकार -- ललित 

मूल्य--७५₹

📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚 ३८|पुस्तक परिचय

    शिक्षक संजीवनी

लेखक- ना.वि.कुंभार

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

बदलत्या काळानुसार उगवत्या पिढीपुढे जाणारे शिक्षक आपल्या पेशात कसे यशस्वी होतील ,हा विचार मनात घर करत असे.त्या विषयी चिंतन मनन करणे.कृतिसत्रे, परिसंवाद आणि व्याख्यानातून व्यक्त झालेले विचार एकत्रितपणे लेखणीतून उतरुन त्यांचे पुस्तक प्रकाशित करण्याचे मला प्रोत्साहन दिले.आत्मिक बळ मिळाले.त्यातूनच 'शिक्षक संजीवनी'ही शिक्षक पेशास सतत उपयोगी पडणारे शैक्षणिक पूरक संहिता तयार झाली.


 श्री नानाभाऊ विठोबा कु़ंभार हे पेशाने शिक्षक.सुमारे ४०वर्षे त्यांनी ज्ञानदानाचे कार्य तपस्वीतिने केले आहे.ग्रामीण भागातील सुमारे ९४ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक करण्याचा तारांकित बहुमान त्यांनी मिळविला आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव 'राष्ट्रीय आदर्श शिक्षक' पुरस्काराने महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित झालेले आदर्श प्राथमिक शिक्षक.अनेक स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या सेवेचा गौरव पुरस्कार प्रदान करुन केला आहे.


आजवर विविध शैक्षणिक मासिके आणि साप्ताहिकातून लेख प्रसिद्ध झाले आहेत.

पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.शाळेविषयी दिशादर्शक 'दीपस्तंभ'म्हणून शिक्षकांना संजीवनी देणारे हे पुस्तक उपयुक्त ठरेल.


सुसंगत विचारांची बैठक असणे.सुनियोजनाची कास धरणे.योग्य वातावरण निर्माण करणे.यासाठी सकारात्मकता होण्यासाठी या पुस्तकाचा चांगला उपयोग होईल.शिक्षण हे व्यक्तिपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे.यातून सुसंस्कारित पिढी घडविण्याचे कार्य शाळा- महाविद्यातून सुरू असते.यासाठी केवळ पाठ्यक्रमाचे ज्ञान उपयुक्त नसते.यासाठी ग्रंथालयातील पुस्तकांचे भावविश्व मुलांपुढे उघडून दाखवावे लागते.समजून द्यावे लागते.

वाचनाची गोडी लागण्यासाठी काय उपक्रम आयोजित करावेत.अशांची सखोल व विस्तृत माहिती दिलेली आहे.


कल्पकता आणि कृतीतून समस्येची उकल करण्यासाठी कोणती वाट चोखळावी याचेही विवेचन सुंदर शब्दात केले आहे.माणसं ओळखणं ही कला आहे.ती अवगत असेल तर आपल्या संपर्कातील सहकाऱ्यांच्या स्वभाव वैशिष्ठे पारखणे.आवडीची जबाबदाऱ्या सोपविणे सुलभ होते.


  या शैक्षणिक पुस्तकात शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी संजीवनी मंत्रासारखे आवश्यक २१घटकांची सविस्तर माहिती दिलेली आहे. सहज सुंदर ओघवत्या शैलीत विवेचन प्रस्तुत केले आहे.शिक्षकांची जबाबदारी, प्रभावी अध्यापनासाठी काय करावे?शिक्षकांचे संभाषण व वक्तृत्व साधना, वाचन कौशल्य, पदोन्नती,मुख्याध्यापकांचे शालेय व्यवस्थापन ,शिक्षकांची कल्पकता, शालेय नियोजन आदी घटकांची माहिती दिली आहे.अंत:प्रेरणा जागृत झालेले समस्त शिक्षक बांधव ज्ञानपंढरीचे वारकरी असतात.ध्येयाची पताका ते खांद्यावर मिरवतात.

अध्यापनाचा गजर टाळाने करतात.'विद्यार्थी देवो भव'हा मंत्र जपत अध्ययन अनुभव देतात.आपल्या शाळेची प्रगती

लोकसहभागातून संवर्धित करतात.आपल्या आचार विचार व उच्चारातून आपली प्रभावी 'शिक्षक'प्रतिमा जनमानसात रुजवितात.

बालकांचा विकास साधण्यासाठी स्वत:चे व्यक्तिमत्त्व गुणसंपन्न करणेसाठी "शिक्षक संजीवनी" वरदायिनी ठरेल,असा विश्वास लेखकांनी व्यक्त केला आहे.


श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾










Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड