काव्य पुष्प-२२१ निसर्ग सौंदर्य
मनाला भुरळ घालणाऱ्या निसर्ग सौंदर्यास
काजळी आकाश
विरळ प्रकाश
निळसर पाणी
झाडोरा रानी |
लाल माती
हिरवी पाती
फुलांच्या वाती
निसर्ग नाती |
रिमझिम बरसती
सरीवर नाचती
भटकू धरणकाठी
घुमूया रानवाटी |
सृष्टीने रुप धारीयले
ते नयनांनी हेरले
मनमुरादपणे पाहिले
मनातनं पाझरले |
शब्दाक्षरांनी रचले
कागदावर उमटले
कडव्यात बध्द झाले
काव्यपुष्पात गुंफले|
Comments
Post a Comment