काव्य पुष्प २१९ परिचारिका दिन
जागतिक परिचारिका दिन
स्त्री रुग्ण सेविका फ्लॉरेंन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिन 'परिचारिका'दिन म्हणून साजरा केला जातो. सर्व परिचारिका ताईंना जागतिक परिचारिका दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या सेवेप्रति सलाम!!!
भयजन्य परिस्थितीत दिलासा देऊन
देशसेवेसाठी करतात कर्तव्यपालन
मातृभावनेने करतात रुग्णांची सेवा
संस्कारक्षम मदतीचा अनमोल ठेवा
रुग्ण वाचवायला सदैव प्रयत्नशील
कर्तव्यभावनेने बनतात ध्येयशील
रुग्णांच्या वेदनांवर घालतात फुंकर
समाजभानाने बनतात कोवीड फायटर
पर्वा न करता करतात कार्य
ममतेने रुग्णांना देतात धैर्य
तमाम परिचारिकांना हार्दिक शुभेच्छा!!!
Nice
ReplyDelete