२६|पुस्तक परिचय, असे घडवा मुलांचे व्यक्तीमत्त्व





📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚

२७|पुस्तक परिचय

    असे घडवा मुलांचे व्यक्तीमत्त्व

लेखिका-डॉक्टर रमा मराठे       

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

    माणसांची भावनिक आणि बौद्धिक क्षितीजे रुंदावत आहेत.दैनंदिन जीवन रहाटगाडग्याला बांधलेल्या छोट्या-मोठ्या कुटुंबात राहणाऱ्या आजच्या पालकांना आपली मुले स्व: अपेक्षेने पालनपोषण करणे अवघड बनले आहे.वाढती स्पर्धा,मानसिक ताणतणाव, होमवर्कचा दबाव, खेळांचा अभाव,सोशल मिडियाचे आक्रमण,खचणारा सांस्कृतिक पाया अशा अडथळे पार करून मुलांचे व्यक्तिमत्त्व कसे जोपासावे.  पालकत्वाची जबाबदारी यशस्वीरीत्या पूर्ण कशी करावी याचे विवेचन साध्या सोप्या भाषेत "असे घडवा मुलांचे व्यक्तीमत्त्व" या पुस्तकात केले आहे.

   डॉक्टर रमा मराठे या वैद्यकीय व्यावसायिक असून  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदातून अनेक शोधनिबंध सादर केले आहेत.तरुण भारत, पुढारी,केसरी, स्वराज्य आणि लोक- स्वास्थ्य इत्यादी मराठी वृत्तपत्रांच्या विशेष पुरवण्यामध्ये यातील लेख प्रसिद्ध झाले आहेत.व्यक्तिमत्त्व विकासाच्या अनेक कार्यशाळा त्यांनी आयोजित केलेल्या आहेत.त्यांची मार्गदर्शनपर 'रंग सुखाचे','हसत जगावं','स्वभावाला औषध नाही',औषधाविना आरोग्य आदी पुस्तके लोकप्रिय आहेत.

वर्तमानपत्रातील लेखमाला वाचकांना आवडली.काहींनी कौतुक,जिज्ञासा आणि अपेक्षा स्वरुपातील प्रतिसाद दिला.त्यातून या पुस्तकाची रचना झाली.मुलांना आणि पालकांनी या पुस्तकाचे स्वागत केल्याने चौथी आवृत्ती काढायला लागली.हीच वाचकांची पुस्तकाला लाभलेली प्रसिध्दी आहे. 

   बालपण देगा देवा….हा सुखसमाधानाचा मुलांच्या बाबतीत असतो.पण मुलांच्या शिक्षणासाठी काय कसरत करावी लागते याची प्रचिती प्रत्येकाला आहे.पालकांच्या अपेक्षांचे ओझे मुलांवर सतत असतं.मुलांवर येणाऱ्या ताणतणावाचा सामना कुटुंबातील सर्वावर येतो.मुलांची इतरांशी तुलना,नोकरी व्यवसायामुळे मुलांना वेळ न मिळणं,मुलांचा आहार ,मुलांच्या मानसिकतेचे अज्ञान अशी अनेक कारणे आहेत.अशी मुले दवाखान्यात उपचारासाठी आली असताना लेखिका डॉक्टर मॅडमच्या लक्षात आले की ,'या बालरुग्णांना औषधांपेक्षाही अधिक गरज समुपदेशनाची आहे'. पालकांशी चर्चा करून,आलेल्या आजारी मुलांशी संवाद साधून आलेल्या समस्येवर प्रश्नावली आणि पत्रकांच्या माध्यमातून 'सुजाण पालकत्वाची संकल्पना' आॅडिओ कॅसेटचा उपयोग करून लेख तयार केले.ते दैनिक वर्तमानपत्रात छापून आले."जे आवडतं ते मिळवणं म्हणजे यश,जे मिळतं ते आवडणं म्हणजे सुख"या उक्तीप्रमाणे निरोगी शरीर,समतोल व्यक्तीमत्त्व आणि सबळ आत्मप्रतिमा हेच महत्त्वाचे आहे.'असे घडवा मुलांचे व्यक्तीमत्त्व' या मार्गदर्शन पर पुस्तकात उद्बोधक उदाहरणे आहेत.यातील कथा ऐकलेल्या,पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या आहेत.पुस्तकातील संपूर्ण आशयात मुलांच्या जडण घडणासाठी पालकांनी नेमकं काय करावं याची सोदाहरण माहिती आहे.परिशिष्टासह चार विभागात लेखमाला समाविष्ट आहे.पालकांचे मुलांशी वर्तन व संवाद, मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दिशा,मुले आणि असल्यास आणि मनोरंजनातून व्यक्तिमत्त्वविकास  सुजाण पालकत्वाची जबाबदारी सांगणारे घटक आहेत.परिशिष्टात विद्यार्थ्यांना अभ्यास प्रश्नावली, वाचन कौशल्य आणि अब्राहम लिंकनचे शिक्षकांना  पाठविलेल्या पत्राचा  समावेश आहे.मुलांच्या सर्वागिण विकासासाठी पालकांनी आपलं मुल समजून घेऊन त्यास संस्कारीत कसं घडवावं याचं वर्णन,विवेचन सहजपणे आशयघन शब्दात केले आहे.व्यक्तिमत्त्व विकासाचे सोपान उलगडून दाखविणारे पुस्तक आहे.

 🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

पुस्तकाचे नाव-असे घडवा मुलांचे व्यक्तीमत्त्व

लेखिका-डॉक्टर रमा मराठे

आवृत्ती- चौथी 

प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे

पृष्ठे-१६८

किंमत-१२०₹

✒️श्री रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड