रम्य सायंकाळ , काव्य पुष्प- २१८
रम्य सायंकाळ
मनमोहक रम्य वेळी
कृष्णामाईच्या काठी
अस्ताच्या रविची
बदलती ललाटी
झाडांच्या पानांतून
ढगांची गडद लाली
रंगछबी पाण्यातून
रमणीय दिसली
हळूवार वाहणाऱ्या
वाऱ्याचा शीतल स्पर्श
मनाला मोहवितो
उधाणतो मोदहर्ष
जलावर तरंग वलयतात
हळूवार विरत जातात
पुन्हा नव्याने उमटतात
जलचर विहारतात
नेत्रसुखद सांजदृश्य
देते जीवाला थंडाई
नितळ संथ वाहते
घाटावर कृष्णामाई
श्री रवींद्र लटिंगे ओझर्डे, वाई
काव्य पुष्प --२१८
Comments
Post a Comment