पाऊले चालती प्रवास वर्णन शुभेच्छा
माझी भटकंती लेखमालिका ५० वी मान्यवरांच्या प्रतिक्रिया.
माझी भटकंती लेख मालिका
याबद्दल मान्यवरांच्या प्रतिक्रिया
सहल,निसर्गदर्शन,गप्पागोष्टी खूप छान वर्णन
५० भाग पूर्ण....सुट्टीत सुद्धा आपल्या लेखनामुळे निसर्गदर्शन घडले .
आपली लेखणी अशीच बहरत राहो.
श्री गणेश तांबे सर फलटण
यथार्थ वर्णन....
लटिंगे सर..आज आपल्या भटकंतीचे अर्धशतक पूर्णत्वास गेले.आपल्या अखंड लेखनास कुर्निसात ;आणि पुढील लेखनास शुभेच्छा...
कोरोना काळात आपल्या भटकंतीने महाराष्ट्र दर्शन घडविले.प्रवास वर्णन करण्याची क्षमता आपल्या लेखणीत ठासून भरली आहे..
'माझी भटकंती' पुस्तक रूपाने प्रकाशीत झाली तर,आम्हा वाचकांसाठी एक पर्वणी असेल...
भटकंतीच्या शतक पूर्तीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा...
श्री अमोल माने वाई सातारा
भटकंती लेखन मालेच्या माध्यमातून तब्बल पन्नास दिवस लेखन करणारे श्रीमान रवींद्रजी लटिंगे सरांमधील लेखकाला सलाम..
वाऱ्याच्या झुळकीने मन सुखावते ... झाडाच्या सावलने मन विसावते ...आणि सूर्याच्या कोवळ्या किरणांनी मनाला प्रसन्नता वाटते...निसर्गात सहज घडणा-या या घटना असल्यातरी निसर्गाच्या कुशीत गेल्यावरच त्याचा आनंद लुटता येतो.
जागतिक कोरोना संकटामुळे कधीनव्हे ते सारं जग स्तब्ध झाले . कित्येकांना हा कालावधी जखडल्यासारखा झाला , परंतु वाॅट्सअॅप वरील भटकंतीच्या माध्यमातून अनेक शिक्षकांनी आपल्यातील सुप्त लेखनकौशल्याव्दारे अनेकांना अचंबित केले.या लेखनप्रपंचात एक दोन नव्हे तर तब्बल पन्नास दिवस अखंडपणे सह्याद्रीच्या कुशीतील ज्ञात अज्ञात ठिकाणांचे प्रवास वर्णन भटकंतीच्या माध्यमातून लेखन करीत निसर्गातील छोट्या छोट्या गोष्टीचे सहजपणे बारकावे टिपले ते भटकंतीवेड्या श्रीमान रवींद्र लटिंगे सरांनी....
आपल्या शिक्षकीपेक्षात ध्येयवेडे काम करीत असताना बदलीच्या माध्यमातून वीसएक वर्षापूर्वी केलेली भटकंतीला या लेखनव्दारे या कस्तुरीमृगाने सकल आसमंत दरवळून टाकला.
सह्याद्रीच्या पर्वतरांगा पायाखाली तुटवताना प्रत्येक पावलांचा लिखीत हिशोब मांडण्याची उबजत कला हा लाॅकडाऊन नसतातर कदाचित आमचेपर्यंत पोहचलीही नसती. माडगणीचे प्रवासवर्णन , मांढरदेवी मार्गे केलेला भोरचा प्रवास, घेराकेंजळ- ओहळीचे वर्णन, रिंगरोडची भटकंची, रांजणघळी, समुद्रवर्णन अशा कित्येक गोष्टीचे शब्दांकन करताना नवनवीन शब्दसंपत्ती वापर करावा तो फक्त आणि फक्त याच स्नेहीजणाने...
भटकंती वर्णन तसा कित्येकदा अवाचनीय विषय परंतु शब्दफुलांच्या लेखन मालेत कित्येकांनी ती आपलीशी केली व उस्फुर्त प्रतिक्रियामुळे आपल्यातील लेखन कला अतिउच्चतम दर्जाची आहे हे सांगण्यासाठी कुणा परिक्षकाची गरज न पडावी...
आपले प्रवासवर्णन असेच स्वरातील श्वास, फुलातील गंध, गंधातील रंगाप्रमाणे रंगत जावो हीच सदिच्छा ....
श्री .शरद पोतदार, बावधन
माझी भटकंती,
या प्रवास वर्णन मालिकेचे ५० भाग पूर्ण झाले बद्दल खूप खूप अभिनंदन..सर असेच लिहीत राहा,तुमच्या लेखणीत साधेपणा आहे ,
सच्चेपणा आहे त्यामुळे तुमचे लेखन मनाला भावते..
राजेंद्र वाकडे तारळे.
मा.रवींद्र लटिंगे सर...
सारे शब्द तसे सारखेच पण त्याला अनुभवाची झालर जोडली की एक अप्रतिम आविष्कार निर्माण होतो...याचीच प्रचिती आपल्या *माझी भटकंती...* या लेखमालेतून झाली...आज बघता बघता त्याचे ५० भाग पूर्ण झाले...
या लॉक डाऊन मध्ये ही घरबसल्या भटकंती झाली ती फक्त तुमच्या जिवंत लेखनशैली मुळेच...शब्दांची संपत्ती, त्याची योग्य गुंफण,आणि तो प्रसंग वाचकाच्या नजरेसमोर जिवंत करण्याचं सामर्थ्य हे आपल्या लेखनाचं वैशिष्ट्य... आपले सारे व्याप बाजूला सारून जेव्हा मनुष्य आपल्या अंतरंगात डोकावून पाहतो तेव्हा स्वत:ची जी "ओळख" होते, ती वास्तव स्वत:ची "ओळख"...
वाक्यरचना कशी करायची हे व्याकरण शिकवते, का करायची हे विचार सांगतो. मला नेहमीच विचारांचा मोह पडतो. माणूस विचारांनी वाढतो, व्याकरणाने नाही....हे व.पु.चं वाक्य अगदी यथार्थपणे आठवतं...
असं विचारांनी समृद्ध होण्याची संधी ही आपल्या लेखमालेच्या निमित्ताने मिळाली...
आपल्या पुढील वाटचालीसाठी आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा...
स्मिता जाधव मॅडम वाई
*माझी भटकंती
*आजच्या गतिमान कालखंडात एखाद्या गोष्टीवर लेखन करुन त्याचे अनुभव हुबेहुबपणे मांडणी करून lockdownचा खरा उपयोग , माझी भटकंती या सदरात मा. श्री लटिंगे सरांनी १ते५० भागात अगदी सहज केला. प्रवास वर्णन पर्यटन याची माहिती जणू प्रत्येक्षात भेट देऊन पहिल्या सारखी वाटली*
*सर आपल्या लेखणीतून अशीच लेखन माला फुलत राहो*
श्री राजेन्द्र क्षीरसागर कवठे वाई
भटकंतीचे भाग ५०
माझा सखा श्रीमान रवीन्द्रजी लटिंगे सरांनी लाॕकडाऊनच्या काळामध्ये एक सुंदर असा उपक्रम राबविला ...
आजपर्यंत त्यांनी केलेले पर्यटन याचे सुंदर असे वर्णन जसेच्या तसे ...जे पाहिले ते लेखनीतून उतरविले.आपणही ब-याच ठिकाणी फिरतो पण त्याचे फोटो संग्रही करून ठेवणे व प्रवासवर्णन करून ठेवणे हे कठिन काम असते ..जे माझ्या मिञाने लिलया पार केले ..मिञा माझाही तुझ्याबरोबर भटकंतीचा खूप वेळा योग आला अगदी गुजरात ..राजस्थान असो की ...माडगणी डोंगर असो ...तुझ्याबरोबर फिरण्याचा आनंद एक वेगळाच असतो.इथून पुढेही तुझ्याबरोबर फिरण्याचा आनंद मला लाभो हीच अपेक्षा !आत्तापर्यंतच्या सर्वच भागामध्ये पर्यटनाचे केलेले वर्णन हे सर्वांना दिशादर्शक असेच होते लोकांना पर्यटनाला कुठे जायचं आहे ..हे माहीत आहे परंतु तिथं जाऊन नेमकं काय पहायच ...हे माहीत नसतं...जे आपल्या लेखातून सगळ्यांना माहीत झालं
मिञा तू स्वतः हुशारच आहेस परंतु तुझी ही हुशारी तू स्वतःपूरती मर्यादित न ठेवता दुसऱ्यांना पण वाटतोस हा तुझा मोठेपणा आहे .,आणि शेवटपर्यंत तुझ्याजवळ असलेले ज्ञान वाटत रहा हीच अपेक्षा
आज भटकंतीचा ५० वा भाग मिञा तू पूर्ण केलास ........म्हणून तुला या माझ्याकडून शब्दरूपी सदिच्छा !इथून पुढेही असच लिहीत जा आम्ही वाचत जाऊ. पुन्हा एकदा तुला या भटकंतीच्या लेखनाबद्दल मनापासून खूप खूप शुभेच्छा !
श्री भास्कर पोतदार वाई
Latinge Sir Nice series of Writing traveling blog. We enjoyed your ethos n will be eager to Read more from You.📖📚📒
shri Vikram Nayakwadi,wai
*मार्गदर्शक मित्रवर्य आदरणीय लटिंगे सर.......*
जगाच्या एका देशातून प्रवास करत करोना आपल्या भारत देशात येऊन पोहोचला. केंद्र व राज्य शासनाने लाँकडाउन करण्यास सुरुवात केली. या लाँक डाऊन मध्ये आपल्या शाळाही लाँक झाल्या. *माझी भटकंती* या सदराखाली अनुभव पूर्ण अनेक विविध लेख लिहिण्यास व लेखनमाला सुरु करण्यास आपणास एक सुवर्णसंधीच मिळाली. मी तर या सदराला *'घरबसल्या भटकंती'* असेच समजतो. कारण या लाँक डाऊन च्या काळात वीकेंडला अथवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लोकांच्या भटकंती करण्याचा सहली आयोजन करण्याचा हक्कच या काेरोनाने काढून घेतला. आणि सुरु झाले सदर *'माझी भटकंती'* . आपल्या भटकंतीचा प्रत्येक भाग हा खुप लांबचा प्रवास करणारा अथवा देशाबाहेर घेऊन जाणारा नव्हता. आपल्याच आजूबाजूचा परिसर, गड- किल्ले पर्यटन स्थळे, मित्रांसमवेत काढलेल्या सहली, कुटुंबासोबत केलेले निसर्ग पर्यटन हे आपण आपल्या लेखणीतून व raviprema.
blogspot.com ब्लॉगच्या माध्यमातून घर बसल्या सर्वांच्या माहितीसाठी उपलब्ध करून दिले. या लेखांतून आपण विविध ठिकाणे लोकांसमोर मूर्तिमंत रूपाने जिवंत केलीत. त्याच बरोबर या ठिकाणी प्रत्येकाने कसे गेले पाहिजे ? काय पाहिले पाहिजे? निसर्गाच्या अविष्कार पाहताना जीवनात आनंद कसा निर्माण केला पाहिजे? याची इत्थंभूत माहिती व मार्गदर्शन आपल्या या लेखांच्या विविध भागांतून केलेला एक यशस्वी प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे. माझी भटकंती यातील काही भागात मी सरांबरोबर चा जोडीदार व साक्षीदारही आहे. आपल्या प्रत्येक भागात आपण व्यक्त केलेले लेखन, प्रत्यक्ष अनुभवांनी शब्दांची केलेली गुंफण खरोखर वाचनीय अशी आहे.आपल्या प्रत्येक लेखात 'जे आहे ते आहे, नाही ते नाही' म्हणजेच 'जसंच्या तसं' आपण मांडलेले आहे. बघता बघता माझ्या भटकंतीचे आपण पन्नास भाग पूर्ण केले. त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन!
या सर्व लेखांची एक जंत्री व्हावी व नवीन नावाच्या शीर्षकाखाली एक पुस्तक प्रकाशित व्हावे एवढीच मनोमन इच्छा आहे.आपल्या विचारांनी समृद्ध होण्याची संधी ही आम्हा सर्वांना लेखमालेच्या निमित्ताने मिळाली...
आपल्या या पुढील लेखनास व वाटचालीसाठी माझ्याकडून आपणांस
मनःपूर्वक शुभेच्छा!
श्री सुनील जाधव (चांदवडी )ता.वाई
भटकंती विशेष
श्री. रवींद्रकुमार लटींगे, सर नमस्कार ! आपल्या *भटकंतीचे* अर्धशतक पूर्ण झाले. भटकंतीचे अर्धशतक पूर्ण करणे आणि ते इतरांना भावेल असे लेखणीतून उतरवणे हे सोपे नव्हे .ते आपण लिलया केले !खरंच मनपूर्वक *अभिनंदन आणि धन्यवाद* सर ! " *निसर्ग आपला मित्र आहे त्याचे संवर्धन करा"* हाच संदेश नकळत आम्हाला दिलात. निसर्ग तंतोतंत रेखाटता येत नाही, टिपता येत नाही, वर्णनही करणे अशक्यच...प्रत्यक्ष तो अनुभवावा लागतो, परंतु आपल्या प्रगल्भ लेखनशैली आणि निरीक्षण क्षमतेनेआम्हालाही घरबसल्या अनुभवता आला.सर्वांत अवघड गोष्ट नियोजन, पण भटकंतीच काय कोणत्याही कार्यक्रमाच्या नियोजनात आपण कार्यनिपुण आहात. आपला एक सहकारी म्हणून अनुभव आहेच आहेच.गडकोट,किल्ले , पर्यटनस्थळे यांची यथायोग्य माहिती या लॉकडाऊन काळात आम्हाला मिळाली. घरबसल्या हे अनुभवता आलं आणि ताण- तणावही दूर झाला. सवंगड्यासोबत भटकंती म्हणजे जीवनातील फार मोठी पर्वणीच! पण *आई -वडील आणि कुटुंबासोबत पर्यटन म्हणजे कर्तव्यपरायणता* !अशा खूप गोष्टी आपणाकडून शिकण्यासारख्या आहेत . आपल्या भटकंतीचा ठेवा पुस्तक रूपाने चिरंतर रहावा आणि अशीच अनुभूती आपल्या भटकंतीतून मिळावी हीच सदिच्छा!! ...केल्याने देशाटन
श्री शशिकांत कदम ,बावधन
खरंच आहे लटिंगे सरांचे प्रवास वर्णन म्हणजे लॉक डाउन च्या काळात मित्रांसाठी पर्वणी होती, ज्यांना भटकण्याची हौस आहे आणि सह्याद्रीच्या दऱ्या डोंगर ज्यांना नेहमी खुणावतात त्यांच्यासाठी मार्गदर्शक आहेच परंतु मित्रांसाठी हक्काचे वाटाड्या आहेत.सर लेखनप्रपंच सुरेख जमला पुढील लेखन कार्यासाठी शुभेच्छा.
श्री उद्धव निकम वाई
कृतज्ञता
धन्यवाद व आभार
मित्रहो, आपण सर्वांनी माझी भटकंती या लेखमालिकेचे सलग शतक झाले त्याबद्दल माझ्या लेखनाचं कौतुक फोन संपर्क, फेसबुक,व्हाटसअप ग्रुपवर लेखांकन (अभिप्राय, प्रतिक्रिया) करुन आपलेपणाने सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आदरणीय शिक्षकमित्र,
वाचक वृंद आणि स्नेहीजणांचे मनपूर्वक धन्यवाद! आभार!
विशेषतः लेखनकलेतील मार्गदर्शक शब्दप्रभू आदरणीय आप्पा श्रीमान सुनील शेडगे पत्रकार शिक्षक मित्राने "मुसाफिर" हा भटकंतीचा लेख प्रसिद्ध केला. समर्पक शब्दांची साखरपेरणी करुन भ्रमंतीच्या विविधांगी पैलूंची ओळख सजगतेने करुन दिली.निसर्गाचे सौंदर्य कसं पहावं आणि भटकंतीतून काय मिळतं याची महती करुन दिली.श्रीमान गणेश तांबे सर अध्यक्ष आई प्रतिष्ठान वाठार फलटण यांनी माझी भटकंती शतक या लेखमालिकेचा समर्पक शब्दातील कौतुकास्पद लेख फलटण टुडे या मिडीयात प्रसिध्द करुन सुखद आनंद दिला.
भटकंती लेखनासाठी प्रेरणा आणि आत्मबळ श्री दीपक चिकणे सर,श्री दीपक मगर सर,श्री शिवाजी निकम सर श्री गणेश तांबे सर ,श्री दीपक भुजबळ सर,श्री शरद पोतदार सर,श्री शशिकांत कदम सर ,श्री राजेन्द्र वाकडे सर ,श्री राजेन्द्र बोबडे सर ,श्री महादेव भोकरे सर ,श्री भास्कर पोतदार सर ,श्री अमित कारंडे सर,श्री संतोष ढेबे सर, श्री राजेन्द्र क्षीरसागर ,श्री शिवाजी चव्हाण ,श्री शिवाजी फरांदे सर,श्री प्रशांत वाडकर,श्री अमोल माने,श्री राहुल हावरे सर,श्री सुनील जाधव सर,श्री उद्धव निकम सर,सौ स्मिता जाधव मॅडम, सौ नलिनी जाधव मॅडम,श्री विकास शिंदे रायडर ,श्री प्रमोद निंबाळकर या मित्रांनी दिले.तसेच अनेक पर्यटन प्रेमी शिक्षकमित्र आणि शब्दप्रभुंनी अक्षरलेण्यातून कौतुक करुन शुभेच्छा दिल्या! सर्वांनी अभिनंदन केले .कौतुक करुन सन्मान केला.
त्याबद्दल सर्व शिक्षकमित्रांचे,स्नेहीजणांचे,बंधूभगिनींचे आणि भटकंतीतील सर्व मित्र परिवाराचे कृतज्ञतापूर्वक आभार
🙏🏻🌹🙏🏻🌹
माझी भटकंती क्रमशः१०० भाग झालेबद्दल प्रतिक्रिया
*आदरणीय गुरूवर्य रविंद्र सर..*
*भटकंती लेखमालेच्या १०० व्या भागाबद्दल अभिनंदन, अभिवादन..
*कोणत्याही लिखाणाची १०० भागांची झेप ही वाटते तेवढी सोपी नाही..*त्याला अभ्यास लागतो, ध्यास लागतो, चिकाटी, संयम, विजिगुषी वृत्ती, कमालीचे धैर्य लागते ते तुमच्या व्यक्तिमत्वात ओतप्रोत भरलेले आहेत..!**म्हणूनच तुम्ही वाचकांची तृष्णा करू शकला आहात. तुमचे लेख वाचताना नकळतपणे तुम्ही त्या परिसराची बारकाव्यांनिशी आम्हाला भटकंती करून आणता. तुमच्या नजरेने आम्ही तो सगळा भाग पालथा घालत असतो..!*
*जनसेवेचा वसा सांगावा लागत नाही आतून येतो तोच खरा असतो..!*
*प्रत्त्येक ठिकाणी तुम्ही अनुभवांची अफलातून पेरणी केली आहे. मजा वाटते वाचताना..!*
*असेच उत्तमोत्तम लिहित रहा..*
*आम्ही वाचत राहू..*
*तुमच्या लेखमालेला मनःपूर्वक शुभेच्छा!
*पुढील वाटचालीसाठी आम्ही तुमच्यासोबत सदैव आहोतच..*
*राजेंद्र बोबडे, सातारा.*
*9823916788
श्रीमान रवींद्रकुमार (दादा)लटिंगे सर यांच्या साठवणीतल्या आठवणीतील माझी भटकंती या लेखाचा १०० वा भाग प्रसारित होणार आहे.एक अफलातून प्रवासवर्णने सरांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारले आहेत.सरांच्या सातत्य व जिद्दीला सलाम.
तसेच भेटी दिलेल्या सर्व स्थळांची तपशीलवार माहिती वाचणे म्हणजे एक अभूतपूर्व पर्वणीच आहे. सरांचे हे सर्व लेख पुस्तक स्वरूपात वाचायला मिळावे अशी आशा व्यक्त करतो . पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो.
श्री शिवाजी निकम
क्रिडा समन्वयक, महाबळेश्वर
मा.श्री.लटींगे सर आपण १०० प्रेक्षणीय (भारत/महाराष्ट्र दर्शन )यात्रा,सहल, पिकनिक च्या माध्यमातून अप्रतिम उत्तमप्रकारे व यशस्वीपणे पूर्ण केले. सदरची प्रेक्षणीय ठिकाणाची परिपूर्ण,सुंदर माहिती फेसबुक च्या माध्यमातून सर्व सदस्यांच्या पर्यन्त प्रसारित केलेबद्दल फेसबुकचे सर्व सदस्य व माझे परिवार यांचे मार्फत आपले त्रिवार अभिनंदन
श्री सुरेन्द्र पारखे साहेब वाई
आदरणीय लटिंगे सर,
आपल्या 'माझी भटकंती' या प्रवासवर्णन मालिकेचे १०० भाग पूर्ण होत आहेत.हा एक मोठा टप्पा आपण पूर्ण केलात. सर आपल्या लेखनामुळे फक्त त्या भागाची माहिती झाली असे नाही तर त्या भागाची नव्याने ओळख झाली, वाचन करत असताना प्रत्यक्ष तो प्रदेश डोळ्यासमोर उभा राहतो, तेथील लोक, संस्कृती आणि इतिहास उभा राहतो. त्यामुळे तो प्रदेश पहावा अशी एक ओढ मनात निर्माण होते .हेच आपल्या लेखनाचे यश आहे.आंम्हासारख्याना तर हे लेखन म्हणजे एक प्रेरणादायी वाटाड्याच आहे.सर आपली पावले जगाच्या कानाकोपरात पोहचवीत आणि लेखनाच्या माध्यमातून ते जग आंम्हा समोर उभं राहावं हीच या निमित्तानं सदिच्छा!
श्री उद्धव निकम,वाई
🌹पर्यटन लेखनाची शंभरी 🌹
माझा सखा व आपणा सर्वांचे मार्गदर्शक श्रीमान रवीन्द्रजी लटिंगे सर यांची लाॕकडाऊनच्या काळातील पर्यटनाची लेखनी तलवारीच्या धारेसारखी तळपत होती .
त्यांच्या लेखनीतून बाहेर पडलेला शब्द नी शब्द वाचक वाचत होते व आपला प्रतिसाद नोंदवत होते .....
आपणा सर्वांच्या प्रेमाची हीच थाप त्यांना प्रेरणा देत गेली व शब्दांची धार वाढत गेली .
मिञा आम्हां सर्वांच्या शुभेच्छा नक्कीच तुझ्या पाठीशी आहेत,तू लिहीत रहा आम्ही वाचत जावू आणि लिहीता लिहीता मोठा लेखक होऊन पुस्तक प्रकाशित होवो याच तुला मनापासून सदिच्छा !
भास्कर पोतदार सर वाई
*भटकंतीचे शतक*.
*मित्रवर्य श्री रवींद्र लटिंगे दादांना भटकंतीची आवड आहेच.पण लाँकडाउनच्या वेळेचा सदुपयोग करून १~१ भाग लिहीत आज १०० वा भाग प्रवासवर्णनाचा पूर्ण करत आहेत.*
*दादा आपण वाचकांचाही प्रवास घडवून आणत होतात. खपच छान लेख आहेत. आपल्या शतकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!*
आपलाच सहदेव फणसे.
मित्रवर्य रवींद्र लटिंगे सरजी,
'भटकंती'च्या लेखमालिकेतील लेखांची शंभरी पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
आपल्या प्रत्येकात कधीच न संपणारे असे काही असते. कधी ते आपल्याला इतरांकडून लक्षात आणून दिले जाते तर कधी स्वतःला आतून त्याची जाणीव होते. अशा अंगभूत कौशल्याचा होईल तेवढा नेटकेपणा जपत आपण विकास करायला हवा!
अनेक कलावंतांना आपल्यातील दिव्यत्वाची जाणीव असते; पण ती फुलवत ठेवू शकतील अशा चाहत्यांची साथ न लाभल्यामुळे त्या प्रतिभेला हवा तसा वेग येत नाही.तुम्ही स्वतः तर लेखन करताच शिवाय इतर मित्रांनी लिहिलेल्या लेखनास आपलेपणाने भरभरून उत्कट दादही देता. रसपूर्ण लेखन करणे आणि लेखनास रसिकतेने दाद देणे या दोन्ही मौलिक गुणांचे तुम्ही धनी आहात!
हार्दिक अभिनंदन आणि मंगल शुभेच्छा!
-श्री महादेव भोकरे.सर
आदरणीय लटिंगे सर*
*आपण माझी भटकंती या लेखमालेचे आज १००भाग पूर्ण केले त्याबद्दल आपले खूप अभिनंदन , प्रवास वर्णन हा आपला लेखन प्रपंच खरचं वाखाणन्या सारखा आहे,आपली लेखन शैली आणि सादरीकरण अचूक आणि सूक्ष्म तपशील वाचकाची उत्कंठा वाढवतात .आपला हा लेखन प्रपंच पुस्तकरूपाने आमच्या हाती येऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि आपणास पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा!
शतकवीर मित्र श्री. रवींद्रजी लटिंगे अभिनंदन आणि शतकोत्तर लेखनासाठी मनस्वी शुभेच्छा!
श्री बाळकृष्ण जगताप सर, सातारा
अभिनंदन सर
लेखनाचा ही पिरॅमिड असाच चढता राहो!
लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा!!!
सौ अनिता गोरे वाई
लटींगे सर, भटकंती करताना घेतलेला आनंद, स्वतः बरोबर, इतरांनाही तुम्ही दिलात. या प्रवास वर्णनाचे आज १००
भाग पूर्ण झाले... खूप मोठी गोष्ट आहे ही.. भटकंतीचे शतकवीर, तुमचे खूप खूप अभिनंदन..असेच लिहीत राहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...
राजेंद्र वाकडे, तारळे.
श्री रवींद्र लटिंगे तू छानच लिहीत आहे लिहीत रहा.१००भाग वाचले .भटकंती करून त्याची नोंद ठेवली आणि लाॅकडाऊनच्या काळात चांगले वाचायला मिळाले फोटो व माहिती उपयुक्त आहे.आपण स्वतः प्रवास केलेचा अनुभव मिळाला. तुझ्या या लिखाणाची कायमची आठवण रहावी म्हणून याचे पुस्तक लवकरच प्रकाशित व्हावे ही सदिच्छा!
दिपक भुजबळ , सातारा
आदरणीय लटिंगे सर...
सर्वप्रथम नमस्कार ‼
पराकोटीची जिद्द ,अथक परिश्रम, नवनिर्मितीचा ध्यास व भटकंतीची विशेष आवड या सर्वच गुणवैशिष्ट्यांनी आपण परिपूर्ण आहात.आनंदाचं जगणं आपल्या भटकंतीतून पहावयास मिळालं.परिवार, मिञमंडळी यांच्यासोबत टिपलेले अविस्मरणीय फोटोज् व आनंदी क्षणांच्या आठवणी आपण शब्दबद्ध केल्यात.हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हे..! मनात आणलेलं सत्यात उतरवायला जिद्द लागते.स्वप्नांचा पाठलाग करावा लागतो.हे तुमच्या अथक १०० भाग लेखनातून प्रत्ययास आले.
आपणामुळे एक नविन उर्जा, नविन प्रोत्साहन मिळाले.उरलेले आयुष्य स्वछंदी जगायला हवे.मनस्वी फिरायले हवे...आपल्यांबरोबर हे मनापासून पटले.आपल्या लेखनातून बहुविध ज्ञानही आपण वाटले.खूप खूप समृद्ध लेखन केले.
आपणांस मनःपूर्वक वंदन..!!
आयुष्यात एक चांगले मार्गदर्शक मिळाले..याचा आनंद झाला.
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!!
आपलाच,
नितीन जाधव,जावली
🍁🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃
श्रीमान रविंद्रकुमार (दादा)लटिंगे सरांच्या
माझी भटकंती या लेखाचा१०० वा भाग सोशल मीडियावर शेअर होणार आहे.एक अफलातून प्रवासवर्णने सरांनी आपल्या सिद्धहस्तलेखणीतून साकारली आहेत.सरांच्या सातत्य व जिद्दीला सलाम.तसेच भेटी दिलेल्या सर्व स्थळांची तपशीलवार माहिती वाचणे म्हणजे एक अभूतपूर्व पर्वणीच आहे. सरांचे हे सर्व लेख पुस्तक स्वरूपात वाचायला मिळावे अशी आशा व्यक्त करतो.पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो!
श्री महेंद्र इथापे,वाई
*आदरणीय लटींगे सर*
लहान मुले घरगुती खेळ खेळताना नेहमी १० २० ३० ४० ५० ते शेवटी शंभर असे म्हणतात आणि शंभर झाले की पळत सुटतात . कोणतीही गोष्ट जास्त हवी असल्यास ती शंभराच्या पटीत मागतात .शंभर आकडा विश्वातील सर्वात मोठा मानला जातो .
शंभरी गाठली की आनंदोत्सव साजरा केला जातो . प्रत्येकाच्या आयुष्यात शंभरी निरनिराळे अनुभव घेऊन येते .आजच्या तुमच्या भटकंतीच्या शंभरीचा आनंद द्वीगुणित होवो .तुमच्या लेखणीला सलाम
सौ अंजली गोडसे मॅडम , सातारा
सुंदर
आपण आपली भटकंती सलग शंभर दिवस मांडली अन् आम्हाला या लाॅकडाऊनच्या दिवसात प्रत्यक्ष सहलीचा अनुभव दिलात.आपल्या सातत्याला , लेखनशैलीला मनापासून सलाम !
असेच लिहिते रहा हिच सदिच्छा!
श्री रविंद्र जंगम फलटण
श्री रवींद्र लटींगे सर शतक ठोकल्याचा आनंद आहेच .पण आपण नाबाद रहावं आणि द्विशतक अगदी त्रिशतकही करावं हीच शुभेच्छा !
श्री विजय पवार सर
आदरणीय लटिंगे सर, *माझी भटकंती च्या शतकपूर्ती साठी मनःपूर्वक शुभेच्छा!
लॉकडाऊन मध्ये बाहेर पडण्यासाठी आसुसलेल्या सर्वांनाच तुम्ही वाई पासून सुरुवात करून अनेक राज्यात फिरवून आणलंत.यापुढेही *वाचनाची भटकंती* अनुभवायची असल्याने आपली *लेखनाची भटकंती* अशीच चालू राहण्यासाठी शुभेच्छा!
सौ शोभा पवार मॅडम वेळे
आदरणीय लटिंगे सर*
*आपण माझी भटकंती या लेखमालेचे आज १००भाग पूर्ण केले त्याबद्दल आपले खूप अभिनंदन , प्रवास वर्णन हा आपला लेखन प्रपंच खरचं वाखाणन्या सारखा आहे,आपली लेखन शैली आणि सादरीकरण अचूक आणि सूक्ष्म तपशील वाचकाची उत्कंठा वाढवतात .आपला हा लेखन प्रपंच पुस्तकरूपाने आमच्या हाती येऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि आपणास पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा!
श्री संतोष ढेबे सर महाबळेश्वर
आदरणीय शतकवीर
लटिंगे सर
आपल्या पर्यटन प्रवास वर्णन लेखन शैली
नित्य नवी टवटवीत राहीली.अप्रत्यक्ष अनुभूती देणारं शिवधनुष्य तुम्ही लिलया पेलले.
अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.जय हो*
श्री अमित कारंडे महाबळेश्वर
आदरणीय लटींगे सर*
*सर्वप्रथम तुमचं माझी भटकंती या लेखमालेचे शंभर भाग पूर्ण केल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन*
*सर भटकंती सगळेच करतात परंतु ती भटकंती आपल्या आयुष्याला पुरेल अशी अनुभवाची शिदोरी तुम्ही जतन करून ठेवली आहे. हे फार लाखमोलाचे काम आहे .फिरायला गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणचं सौंदर्य निरीक्षण,वेगळेपण, छायाचित्रण, आणि या सर्व गोष्टींच डायरीत बारकाईने नोंद ठेवणं हे फार कौशल्याचं काम तुम्ही पार पाडलंय.*
*तुमच्या हातून असंच भविष्यात लेखन व्हावे व ते आम्हाला वाचायला मिळावे हिच आमची इच्छा*
*भावी वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा!*
श्री.लक्ष्मण नरुटे सर
सर आपला शतकोत्तर लेखनप्रपंच प्रकाशित स्वरुपात वाचकांच्या भेटीस यावा हीच सदिच्छा!!
सौ उषा महांगडे वाई
श्री लटिंगे सर आपल्या प्रवासवर्णन लेखनाच्या शतक पूर्णत्वास हार्दिक शुभेच्छा ! असेच माहितीपूर्ण सुंदर व वाचणीय प्रवासवर्णन वाचण्यास मिळावे यासाठी पुढील प्रवासासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा!!
सौ नलिनी जाधव मॅडम वाई
*गुरुवर्य श्रीमान लटिंगे सर..*
*आपल्या विलोभनीय प्रवास वर्णनास कुर्निसात.*
*लॉकडाऊन काळातील आपल्या भटकंतीचा प्रवास एक पासून सुरू होऊन त्याने शतकपूर्ती केली हे कधी घडले समजलंच नाही..*
*आपली भटकंती रोज मनोमन उत्कंठा वाढवणारी व घरी बसून नवनवीन ठिकाणे व त्याची इत्थंभूत माहिती मिळण्याची पर्वणी असायची..*
*आपल्या तेजोमय लेखणीच्या प्रवासाचे भागीदार होण्याचे महतभाग्य लाभले..असा आपला लेखन प्रवास चंद्रकलेप्रमाणे उत्तरोत्तर वाढत जावो.ही भटकंती पुस्तकरूपाने लवकरच प्रकाशीत होवो; हीच सदिच्छा...*
*आपल्या आगामी आत्मचरित्र लेखनास मनोमन शुभेच्छा...*
श्री अमोल माने सर वाई
श्री लटिंगे सर, 'माझी भटकंती 'या आपल्या सहज, सुंदर, अप्रतिम मनमोहक फोटोसहित प्रवासवर्णन लेखनाचे शंभर भाग पूर्ण झाले त्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा !
सौ संगिता गायकवाड,वाई
अभिनंदन सर !
आपल्या लेखनाचे आज १००भाग पूर्ण झाले.अप्रतिम वर्णन प्रत्येक भागाचे.प्रवास वर्णन वाचून प्रत्येक ठिकाणी जावून आल्यासारखे वाटले. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा!
सौ स्वाती पाखरे,वाई
दादा लेखमालेच्या शंभराव्या भागाबद्दल मनस्वी अभिनंदन दादा आपल्या सिद्धहस्त लेखनीतून साकारलेले लेख मालेचे १०० भाग म्हणजे आम्हा वाचकांसाठी एक उत्कट अनुभूती होती आणि त्यासोबतच आपल्या छायाचित्रणातून अप्रतिम छायांकन प्रत्यक्ष प्रवासाचा साक्षात्कार घडवत होते. पुस्तकरूपी प्रवासवर्णन लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा !
श्री संतोष धुरगुडे सर वाई
लटिंगे सर,
" माझी भटकंती " या शीर्षकाखाली आपण स्वतः, मित्र परिवार ,तसेच कुटुंबातील व्यक्ती व आप्तेष्ट यांचे समवेत परिसरापासुन ते विविध राज्यात प्रत्यक्ष प्रवास करून मनसोक्त आनंद घेतला.प्रत्येक ठिकाणाचे सूक्ष्म निरीक्षण केले.प्रसंग, तसेच प्रत्येक स्थळांचे चित्रीकरण केले.
माहे मार्च पासून "माझी भटकंती "या नावे एक एका भागात अखंडपणे अप्रतिम लेखनीतुन ही मालिका गुंफली.केलेले वर्णन वाचत असता स्वतः प्रवास करतो आहे असे वाटे.आजच्या या मालिकेतील भागाने पहाता पहाता शतक साजरे केले.त्याबद्दल आपले मनोभावे अभिनंदन!"""!!!!!!!
असेच लेखन आपणामार्फतव्हावे अशा मनपूर्वक शुभेच्छा !
सपकाळ बी.एम.बालेघर(सातारा
नमस्कार ,मा.रवींद्रजी लटिंगे यांच्या शंभरी गाठलेल्या भटकंती लेखमालेचा वास्तव उत्सव हा जनमानसात गरूड भरारी ठरला .या लेखमालेला पुस्तक रुपाने उदंड प्रतिसाद मिळेल यात शंका नाही .या दिशादर्शक कार्याला शिरगाव शाळा परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा!!Orchid !!
श्री रामचंद्र टिके सर ओझर्डे
*शतकपुर्तीच्या हार्दिक शुभेच्छा*आमचे सर्वांचे आवडते एक उत्कृष्ट संघटक,तसेच दुसर्यांना प्रेरणा देणारे, नि:स्वार्थीपणे आमच्या पाठीशी उभे राहणारेआदरणीय आमचे परममित्र *श्री लटिंगे सर (दादा )*यांची भटकंती ही लेख मालिका म्हणजे मानवी जीवनाचा भूतकाळ, वर्तमानकाळ, आणि भविष्यकाळाची खरीखुरी नांदी आहे
त्यांनी लिहिलेली भटकंती हा लेख वाचताना असं वाटत की आपण त्या वेळी तिथेच आहोत की काय पण खरे सांगायचे तर आपणास आपल्या काही अडचणीमूळे सरांच्या (दादांच्या)बरोबर जाता आले नाही पण त्यांच्या लेखमालेमूळे तेथे असल्याचा भास होत आहे.
या लेखमालेची महती भरारी घेणारी ठरली आहे. तुमच्या जिद्दीला आमचा सलाम
पुन्हा एकदा शतकपुर्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
शुभेच्छुक *श्री कासुर्डे डी. जी .*
नमस्कार
भ्रमंती ही आपली लेखमाला शंभरी पार करत आहे .आम्हाला सुद्धा भ्रमंतीची खूप आवड आहे . माणूस रिफ्रेश होतो. परंतू वर्षानुवर्षाच्या आठवणी शब्दबंधनात बांधने तसे अवघडच, ते शिवधनुष्य आपण लिलया पेललेत. लोकांच्यात यामुळे पर्यटणाची आवड निश्चितच जागृत होईल यात शंका नाही .
या लेखमालेबद्दल आपल्याला मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!
नागेश जगताप ,आनेवाडी
भटकंती चे आपले नाबाद १०० भाग प्रसारित झाले. आपली प्रवासवर्णने वाचताना जणू स्वतः तिथे आहोत असा प्रत्यय येतो दर्जेदार सुंदर असे आपले लिखाण असते आम्हां वाचकांना एक वाचन पर्वणीच असते आपले लिखाण असेच बहरत जावो पुढील वाटचालीस आपणास खूप खूप शुभेच्छा!
श्री रमेश लोखंडे, कवठे वाई
अतिशय छान लेखन..प्रेरणादायी.. ज्यामुळे आम्हा वाचकांना देखील अशा पद्धतीने आठवणीतील प्रवास वर्णने किंवा इतर अनुभव लिहिण्याचा मोह आवरत नाही..तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा..
श्री राहुल वाकचौरे सर संगमनेर
अतिशय छान लेखन..प्रेरणादायी.. खूप शुभेच्छा....गुरुजी म्हणजे शान आहेत ओझर्डेची
श्री सोमनाथ भंडलकर फोटोग्राफर ओझर्डे
माझे वर्गमित्र श्री रवींद्र लटिंगे यांनी अतिशय सुंदर शब्दांकनात प्रवासवर्णनाचे १०० भाग यशस्वीपणे पूर्ण केले. प्रत्येक भाग वाचताना प्रत्येक वेळी आपण स्वतः तो निसर्ग प्रवास करीत आहोत असा भास व्हायचा.
खूपच सुंदर व आर्कषक लेखनशैली त्यांची आहे. त्यांच्या पुढील लेखनांस अनंत अनंत शुभेच्छा..!
श्री अनिल पवार सर सातारा
गुरुजी अभिनंदन !आता आठवणींचे पुस्तकरूपाने प्रकाशन केलेच पाहिजे.
श्री विक्रमसिंह पिसाळ देशमुख ओझर्डे
१०० धावा बनवणेसाठी काढलेली प्रत्येक धाव ही महत्वाची असते.
शतकपूर्ती ही नक्कीच महत्वपूर्ण आहे.
श्री धर्मेंद्र दीक्षित, वडवली वाई
छोटीशी सुरुवात 100 भागापर्यंत कशी पोचली ते कळाले देखील नाही अभिनंदन सर.
श्री शैलैश पिसाळ देशमुख ओझर्डे
आदर्श व उपक्रमशील शिक्षक श्री.रवींद्र लटिंगे सर हे ता.वाई या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.सरांनी आपल्या भटकंती प्रवासाचा आठवणीतल्या साठवणी याचा १००वा भाग पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे प्रथमतः अभिनंदन!!!
एप्रिल महिन्यात सुरू झालेली भटकंतीचा प्रवास, साठवणीतील आठवणी लेखनाचा आज श्रावण महिन्यात १०० भाग पूर्ण होत असताना यावेळी मला बालकवींच्या कवितांच्या काही ओळी आठवतात,
श्रावण मासी हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे,
क्षणात फिरुनी उन पडे.
या काव्य पंक्तीप्रमाणे त्यांचे लिखाण मनामध्ये हर्ष ,उल्हास, नवचेतना, निसर्ग अनुभव, याची प्रचिती देऊन जात आहेत. सध्याच्या लॉकडाउनच्या काळामध्ये घर बसल्या कडक उन्हाळ्यातही आदरणीय सरांचे लिखाण मनाला आणि चित्ताला गारवा देऊन जात होते. त्यांच्या लेखणीत खूप मोठी ताकत आहे त्यांनी असेच पुढे लिहीत राहावे हे मनापासून मनापर्यंत आलेली इच्छा!
खरतरं उपक्रमशील शिक्षक समूहातील सर एक सदस्य आणि या उपक्रमशील शिक्षक समूहाचे कुटुंब प्रमुख आदरणीय सुनील शेडगे सर यांच्या लिखाणामुळे अनेकांना लिखाणाची प्रेरणा मिळाली आणि त्याची प्रचिती आज आपणास दिसून येत आहे.नुकतेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री.भागवत साहेब ,शिक्षणाधिकारी कोळेकर मॅडम, माध्यमिक शिक्षणाधिकारी क्षीरसागर साहेब व सकाळ वृत्तपत्राचे संपादक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झूम मीटिंग द्वारे उपक्रमशील शिक्षक हे अतिशय प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन झाले, या पुस्तकातही लटिंगे सर यांच्या कार्याचा लेख मनाला प्रेरणा देतो.
खरंतर आदरणीय रवींद्र लटिंगे सर यांना आपल्या आई प्रतिष्ठान ,वाठार निंबाळकर चा पुरस्कार त्यांचा कोणताही प्रस्ताव न येता केवळ त्यांच्या कार्याचा सुगंध दरवळत आपल्यापर्यंत पोहचला यांनी त्यांना तो दिला गेला, आणि त्यांची प्रथम भेट २८ नोव्हें.२०१८ रोजी वाठार निंबाळकर या ठिकाणी झाली.
सर्वात अगोदर कार्यक्रमाला पोहचलेले आणि कार्यक्रमासाठी ,नियोजनासाठी तयारीला काही मदत लागली तर आवर्जून सांगा म्हणणारे त्यांचे सर्व मित्र परिवार,असा सरांच्या स्वभावातील मुख्य सहकार्य गुण त्या ठिकाणी दिसून आला.त्यावेळी त्यांना श्रीमंत संजीवराजे ना.निंबाळकर (मा.अध्यक्ष जि.प.सातारा ) यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.मला मनापासून खूप आनंद होतोय की ते आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर चे एक सदस्य झाले आहेत.
आदरणीय रवींद्र सरांनी भटकंतीचा प्रवास जो लिहिलेला आहे तो खरोखरच सर्वांना प्रेरणादायी तर आहेच परंतु इतरही निसर्ग प्रेमींना फिरताना त्या लेखाचा,लिखाणाचा खूप मोठा फायदा होणार आहे.
सरांनी या लेखनाचे एक सुंदर असं पुस्तक तयार करावे, असं मनापासून वाटतं त्या पुस्तकासाठी आई प्रकाशन वाठार निंबाळकर हे त्यांना प्रकाशन म्हणून सहकार्य करील.
आज १०० व्या भागा निमित्त आदरणीय सरांना त्यांच्या घरी जाऊनच शुभेच्छा देण्याचा मानस होता.परंतु सध्याची कोरोणा सदृश्य परिस्थिती पाहता सरांना फोनवर आणि या लेखाद्वारे खूप साऱ्या शुभेच्छा! आपण सर असेच लिहीत राहावे आणि आम्हा वाचकांना तुमचे लिखाण वाचण्यासाठी मिळत राहो.
ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहतो आणि पडणारे पावसाचे पाणी अलगद धरतो ,त्याच प्रमाणे आपल्या लिखाणाची वाट चातक पक्षाप्रमाणे आम्ही सर्वजण पाहत असतो,आणि ते लिखाण मनाच्या हृदयाच्या कप्प्यांमध्ये या आठवणीतील साठवणी साठवून ठेवत असतो. या लेखनाच्या १०० व्या भागाप्रमाणे आपले आयुष्यही शतायुषी व्हावे ही सदिच्छा!
तुम्हाला पुन्हा एकदा समस्त शिक्षक परिवार आणि आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर कडून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
श्री गणेश तांबे सर
अध्यक्ष आई प्रतिष्ठान वाठार (निंबाळकर)फलटण
Comments
Post a Comment