काव्य पुष्प-२२२ जागतिक कविता दिन

जागतिक कविता दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!
       कविता


कविता म्हणजे भावना

कविता म्हणजे रचना

कविता म्हणजे कल्पना

कविता म्हणजे प्रेरणा


भावनिक पेरण

ह्रदयाचे स्पंदन

अक्षरांचे धन 

शब्दांची गुंफण


मनातल्या भावभावना

कागदावर उमटल्या

शब्दांच्या रुपात बांधून

कवितेच्या ओळी झाल्या


नयनांनी टिपले

मनात साठविले

मेंदूने आदेशले

हाताने रेखाटले 


भावनांचा शब्दकल्लोळ 

काव्यसुत्रात रचला 

चित्र प्रसंग घटनास्थळं

काव्यपुष्पात बहरला


कवितेचा छंद 

मनाला गुंतवितो

विचारचक्रांना

चालना देतो 


शब्दांचा मेळ

यमकात गुंफतो 

अक्षरांचा खेळ 

पटावर मांडतो 


श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

२१ मार्च २०२१

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड