४२|पुस्तक परिचय, जगण्याची कला विपश्यना साधना



📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚    

४२|पुस्तक परिचय

   जगण्याची कला विपश्यना साधना

लेखक-आचार्य सत्यनारायण गोयंका /

विलियम हार्ट 

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

"सम्यक् दृष्टीतूनच् सम्यक संकल्प निर्माण होतात.

त्याचप्रमाणे संकल्पातून वाचा,वाचेतून कर्म,कर्मातूनच् उपजीविका, उपजीविकेतूनच् प्रयत्न,प्रयत्नातूनच् सजगता,सजगतेतूनच समाधि आणि समाधितूनच् सम्यक प्रज्ञा निर्माण होते."विपश्यना साधनेला व्यवहारी जगात देखील विशेष महत्त्व आहे.

  शरीर व मनाद्वारे येणाऱ्या अनुभवापुरतेच जग आपल्यासाठी खऱ्याअर्थाने अस्तित्वात असते.स्वत:च्या अंतर्जगताचा शोध घेण्याचा एक मार्ग म्हणजे आचार्य सत्यनारायण गोयंका शिकवित असलेली 'विपश्यना' हा ध्यानविधी होय.स्वत:च्या शरीर व मनाच्या सत्याचा शोध घेण्याचा एक व्यवहार्य मार्ग.त्याच्या प्रयोगाने आपल्या शरीरात व मनात खोलवर दडलेल्या समस्यांची उकल होऊन,त्याचे निरसन होण्यास मदत होते.सुप्त सामर्थ्याचा विकास होतो.त्या'जगण्याची कला विपश्यना साधना'या पुस्तकाचे लेखन आचार्य सत्यनारायण गोयंका यांनी केले आहे.

   'विपश्यना'हा शब्द भारतातील प्राचीन पाली भाषेतील असून ,त्याचा अर्थ'अंतर्दृष्टी',अंतरंग जाणण्याची कुवत असाआहे.विपश्यना साधना ही भारताची अत्यंत प्राचिन आध्यात्मिक विद्या आहे.विपश्यना हे गौतम बुद्धांच्या साऱ्या शिकवणुकीचे सारं आहे.तिचा गाभा आहे.हाच त्यांनी संशोधन केलेल्या सत्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे.संपूर्ण दु:खमुक्ती अनुभवलेल्या त्यांच्या अर्हत भिक्षुंनी लोककल्याणासाठी भारतभर चारिका करीत प्रचार केला.

काही शिष्यांनी भारताबाहेरील देशांत या विद्येचा प्रचार केला.ब्रह्मदेशात या विधिला समर्पण भावनेने जपणाऱ्या आचार्यांच्या गुरुशिष्य परंपरेमुळे ही साधना आपल्या शुध्द स्वरुपात कायम राहिली.ती साधना या परंपरेचे विख्यात आचार्य सयाजी ऊ बीन यांनी सत्यनारायण गोयंका यांना दिली.

         मंगलदायी विपश्यना साधनेचा अभ्यास गंभीरतेने करण्यासाठी इगतपुरी येथेआश्रमाची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषिक त्याचा लाभ मोठ्या संख्येने घेत आहेत.

विपश्यना साधनेची प्रेरणादायक माहिती देणारे परिपूर्ण पुस्तक उपलब्ध करून दिले आहे.आचार्य सत्यनारायण गोयंका यांची दहा दिवसांच्या शिबीरातील दररोज दिली जाणारी व्याख्याने या पुस्तकात समाविष्ट केलेली आहेत.

शिबीर सुरू असताना शिक्षकांनी दिलेली स्पष्टीकरण हे साधकांना टप्प्याटप्प्याने येणाऱ्या ध्यानाच्या अनुभवाशी संबंधित आहे.ध्यान साधनेचा प्रत्यक्ष अनुभव नाही त्यांच्यासाठी स्पष्टीकरण व विचारांची पुनर्रचना या पुस्तकात केली आहे. या साधनेची परिपूर्ण माहिती दश अध्यायात असून प्रत्येकात एक कथा सादर केली आहे.आणि सोबत उदाहरणे,दाखले आणि छोट्या गोष्टींचा समावेश केला आहे.

प्रश्नोत्तरे प्रत्येक अध्यायात गोष्टींच्या अगोदर आहे.सहजसुंदर सोप्याभाषेत स्पष्टीकरण केले आहे.पोहण्याची कला,शोध-

मार्गावरील वाटचाल,मार्गक्रमणाची सुरुवात-  भगवान बुद्ध आणि शास्त्रज्ञ, तात्कालिक कारण-बीज व फळ, समस्येचे मूळ-गारगोट्या व तूप,शील सदाचाराची शिकवणूक-डॉक्टरांनी दिलेलीऔषधांची चिठ्ठी,एकाग्रतेची शिकवणूक

-दुधाची खीर,प्रज्ञा विकसित करण्याचे प्रशिक्षण-दोन

अंगठ्या, सजगता व समता-पाहण्यात मात्र केवळ पाहणे, अंतिम ध्येय-तेलाचीबाटली,

    जीवन जगण्याची कला-'विपश्यना' ध्यान विधिचे चित्तवेधक पुनरागमन आणि तीन परिशिष्ट व एक संदर्भ सूची उपलब्ध आहे.पुस्तकाचे वाचन करून आपणाला 'विपश्यना साधना'या विषयी माहिती मिळेल.परंतु साधना विधीचे प्रशिक्षण सुयोग्य आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि योग्य वातावरणातच शिकणं महत्त्वाचे आहे.विशेष सावधगिरी बाळगावी लागते.दहा दिवस एकमेकांशी संवाद करायचा नसतो.आहारही कमीतकमी घ्यावा लागतो.

मनोरंजन व करमणुकीपासून अलिप्तता,केवळ स्वत:चा विचार.शांतपणे मनानं अंतर्यामी साधनेचे ध्यान आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली सुचनेनुसार कृती करत राहणे.एकंदर विपश्यना साधनेची माहिती या पुस्तकात समाविष्ट केलेली आहे.


परिचय कर्ता -श्री रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

पुस्तकाचे नांव-जगण्याची कला विपश्यना साधना

लेखक-आचार्य सत्यनारायण गोयंका/विलियम हार्ट

प्रकाशन-विपश्यना विशोधन विन्यास,धम्मगिरी इगतपुरी

आवृत्ती-चतुर्थ आवृत्ती

पृष्ठ संख्या-१८६

मूल्य-५०₹

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड