काव्य पुष्प -२२३ अवकाळी पाऊस


 











अवकाळी पाऊस


सूर्य डोक्यावरी असताना

आभाळात मेघ कडाडले 

उन्हाच्या लाहीकाहिलीला

शिडकाव्याने गार केले|


वाऱ्याच्या तालावर नाचला

टपोऱ्या गारांसह वर्षावला 

नांगरुन पलटलेल्या धरेला  

तुषारांनी सिंपले मातीला|


सांजवेळी अचानक पडला

सोनेरी उन्हात तुषारला 

 मृदेचा सुगंध दरवळला 

हवेत गारवा वाढला |


आज वाटले पडताना 

मनीचा पुरवेल ध्यास

अचानक विरळताना

लावली ओढीची आस|


ओलंचिंब भिजायचं 

सपान अधूरं राहिलं

वळिवाच्या ताश्याची

वाट बघाया लावलं |


काव्य पुष्प-२२३


२७ एप्रिल २०२१ 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड