४१|पुस्तक परिचय,आनंदवन प्रयोगवन



वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई पुस्तक क्रमांक-४१ पुस्तकाचे नांव--आनंदवन प्रयोगवन लेखकाचे नांव--डॉक्टर विकास आमटे

अनुवाद-गौरी कानेटकर प्रकाशक-समकालीन प्रकाशन, पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-डिसेंबर २०१४/प्रथमावृत्ती एकूण पृष्ठ संख्या-१९२ वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी, ललित ई. )--माहितीपट मूल्य--२५०

📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚

४१|पुस्तक परिचय

    आनंदवन प्रयोगवन 

लेखक- डॉक्टर विकास आमटे

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

अपार कष्ट आणि नावीन्यपूर्ण प्रयोग यांच्या बळावर समाजसेवक बाबा आमटे यांचं समाजाने उपेक्षित ठेवलेल्या कुष्ठरोग्यांच्या मानवमुक्तीचं स्वप्न साकारलेल्या ध्येयवेड्या बाबांची गोष्ट'आनंदवन प्रयोगवन'या ग्रंथांत लिखित केली आहे.सन २०१४ हे बाबांचं जन्मशताब्दी वर्ष.त्या निमित्ताने प्रकाशित केलेले हे पुस्तक आनंदवनाची गोष्ट सांगणारे आहे.

  आनंदवनातल्या कामाचा समग्र दस्ताऐवज मांडणारे पुस्तक.आपल्याला फक्त 'आनंदवन म्हणजे कुष्ठरोग्यांचे कार्य करणारी संस्था'एवढीच जनमानसात रुजलेली ओळख आहे.प्रत्यक्षात क्षितिजापल्याड जावून अंध-अपंग-कर्णबधिर- बेरोजगार-आदिवासी-शेतकरी अशा चौफेर समाजातील उपेक्षित वंचित घटकांना न्याय, निरोगी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची संधी देणारं मॉडेल आनंदवनाने घडविले आहे.शेती,पर्यावरण,पाणी, उद्योग,शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि घरबांधणी आदी क्षेत्रांत नानाविध प्रयोग करून पायाभूत काम संस्थेने उभारले आहे.विशेष म्हणजे,

समाजाने नाकारलेल्या साधल्या माणसांच्या कष्टातून हा चमत्कार घडला आहे.आजमितीला आनंदवन सुखाने नांदणारं गाव असून,गावखेड्याच्या विकासाचे यशस्वी उदाहरण आहे.बाबांचं स्वप्न रुजविणाऱ्या प्रयोगशील हातांची ही गोष्ट सर्वांना प्रेरणादायी आहे.

गेली पन्नास वर्षे बाबांचे स्वप्न साकार करण्याचं

काम सहकाऱ्यांच्या मदतीने डॉक्टर विकास आमटे करीत आहेत.अंध अपंग आणि वंचित कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचं केवळ काम न करता प्रत्येकाला न्याय्य, समृद्ध आणि अर्थपूर्ण आयुष्य जगता यावं यासाठी बाबांना प्रयत्नशील राहून उपेक्षितांचे जीवन फुलवायचं स्वप्न होतं. कुष्ठरोग्यांना अंधकारमय जीवनातून प्रकाशाकडे न्यायचे होते.अहोरात्र ते कार्यरत राहून सेवा करत राहिले.त्या गोष्टींचा प्रवास 'आनंदवन प्रयोगवन 'या पुस्तकात गौरी कानेटकर यांनी शब्दादीत केला आहे.नेमक्या घटनाप्रसंगातून सहजसुंदर भाषेत  उलगडा केला आहे.याचा प्रत्येक वाचताना पानोपानी दिसतो.आनंदवनाचा फेरफटका वाचताना घरबसल्या घडतो.

ही गोष्ट संस्थेला प्रयोगवन बनविणाऱ्या असंख्य हातांची आहे.कामाचा धर्मास घेतला की अशक्यप्राय गोष्ट ही शक्य होते. हे दाखवून देणारी आहे.आजवर हजारो व्यक्तींच्या तनमनधाने ही वास्तू उभी राहून अनेक प्रयोगशील उपक्रम राबवून साफल्यता मिळविलेले आनंदवन आहे.बाबा आणि ताई यांचं आनंदवन हे कार्यशिल्प आहे.

    सात विभागात आनंदवनाची अंतरंगी गोष्ट प्रस्तुत केली आहे.एवढ्या मोठ्या श्रमाश्रम विद्यापीठाची गोष्ट लिहिण्याचे शिवधनुष्य डॉक्टर विकास आमटे आणि शब्दांकित गौरी कानेटकर यांनी लिलया पेललं आहे.गोष्ट सांगण्यापूर्वी,

दडलेली बोटं,निर्मितीक्षम हात; रोगमुक्तीचा वाढता परीघ,हिरव्या निर्मितीचा ध्यास,उद्योगातून आत्मसन्मान,कुष्ठमुक्तांचे हात वंचितांच्या मदतीला आणि नव्या प्रयोगांच्या दिशा यात आनंदवनाचे प्रयोग गोष्टींच्या बीजेतून रुजवायला प्रवाहित केले आहे.

वाचताना आनंदवनाचे चित्र आणि व्यक्ती नजरेसमोर तरळतात.खरच वाचनीय पुस्तक आहे.आनंदवनाचे प्रयोगवन बनवायला केलेल्या कष्टमय, संघर्षमय प्रवासाची महती लक्षात येते.

बाबांचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी डॉक्टर विकास आमटे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या भारतीय आणि जीवाभावाच्या सर्व सोबत्यांना अर्पण केले आहे.या कृतीग्रंथात आवश्यकतेथे समर्पक छायाचित्रे असल्याने लेखातील माहितीची वास्तवता समजते.

आनंदवन उभं करण्यात अक्षरशः हजारो व्यक्तींचे हात लागलेले आहेत.आनंदवनात आजपर्यंत किती कुष्ठरोगी व इतरही कार्यकर्ते येवून गेले याची मोजदाद ठेवणंही शक्य नाही.त्यातल्या प्रत्येक व्यक्तीमुळे आनंदवनात मोलाची भर पडली आहे.आनंदवन ज्या गावांमध्ये आहे,त्या वरोऱ्या पासून ते परदेशापर्यंतच्या अनेक हितचिंतकांनी विविध प्रकारचे पाठबळ पुरविले आहे.तनमनधन अर्पण केले आहे.

आनंदवनाच्या मुख्य कमानीतून आत शिरलं की आनंद निकेतन कॉलेज, हॉस्पिटल,स्नेहसावली संकुल , डेअरी फार्म आणि ग्रामपंचायत कार्यालय बघत आपण एका छोट्या चौकात येतो.हे आनंदवनाचे मध्यवर्ती ठिकाण आहे.हसत खेळत वावरणाऱ्या माणसांची इथं वर्दळ असते.'संधि निकेतन'नावाचे निवासी व्यवसाय प्रशिक्षण केंद्रही आहे.

त्याच्या पुढं आनंदवनाची शेती आणि वसाहती नजरेत भरतात.आनंदसागर तलाव तर भर उन्हाळ्यातही पाण्याने भरलेले असतात.तदनंतर आनंदवन एम. आय. डी. सी.

हरतऱ्हेची उत्पादने तयार होतात.अगदी सतरंजी ते तीन चाकी सायकल आणि शुभेच्छापत्रे ते कुलरपर्यतची उत्पादने

इथे तयार होतात.आनंदवन केवळ कुष्ठरोगी, अंध-अपंग-कर्णबधिर यांच्याच वसाहती नसून ती एक प्रवृत्ती आहे.

दुसऱ्याची व्यथा जाणून त्यांच्याशी एकरुप होण्याचा प्रयत्न करणारी माणसं आहेत.वेदनेवर मात करून नवनिर्माण करण्याचा ध्यास आहे.आत्मनिर्भर बनण्याची जिद्द आहे.

उपक्रमशिलता,सहकार आणि जगण्याची नवी उमेद म्हणजे आनंदवन आहे.

आनंदवनाच्या या गोष्टीचे बीज भारतात, महाराष्ट्रात जिथे गरज असेल तिथं जाऊन पडावं,रुजावं आणि त्यातून उत्तरांच्या दिशेने प्रवास सुरू व्हावा.एवढीच इच्छा आहे.तसं होणं हीच बाबांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने झालेली वाटचाल असेल.अशी अपेक्षा डाॅक्टर विकास आमटे यांनी व्यक्त केली आहे.एक सर्वांगसुंदर कलाकृती वाचकांना उपलब्ध करून दिली आहे.अप्रतिम अक्षरशिल्प आहे.


परिचय कर्ता -श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾




Comments

  1. नेहमीच निवडक व समाजोपयोगी ध्यासाने प्रेरीत करणारी पुस्तके आपण एक वाचक म्हणून निवडत असता....पुस्तक परिक्षण सुंदरच..!!

    ReplyDelete
  2. आपणास मनःपूर्वक धन्यवाद दोस्त नितीन जाधव सर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड