३२|पुस्तक परिचय, संभाषण चातुर्य





📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚

३२|पुस्तक परिचय

         संभाषण चातुर्य

लेखिका-आशा परुळेकर 

 🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

     मानवाला इतर प्राण्यांपेक्षा कुतूहल,विचारशक्ती, भाषा आणि वाचा अशा वैविध्य  गोष्टी बहाल केलेल्या आहेत.

वाणी,भाषण आणि संभाषण या तिन्हीत एकजिनसीपणा आणि अतुटता असेल तर एखादी व्यक्ती समुहात व्यक्त होते.त्यांचे भाषण सगळेच ऐकत राहतात.यालाच त्याचं प्रभावी भाषण संबोधलं जाते.इतरांना ते रोचक रंजक व वैचारिक वाटू लागते.प्रत्येकाची बोलण्याची शैली वेगवेगळी असते.भाषेचे ज्ञान अवगत असणे,हे मेंदूची वाढ व विकासावर अवलंबून असते.पण भाषेचा अभ्यास किती खोलवर आहे.हे आपणाला त्यांच्या व्याख्यानातील संभाषणातून लक्षात येते.त्याने वापरलेले,पेरलेले सुविचार

, म्हणी, थोरांचे विचार,चुटके इत्यादींचा  समयोचित प्रसंगान्वये केलेला वापर दिसून येतो.बहारदार चांगले भाषण होतं.ही संभाषण कला आपल्यालाही थोड्याशा सरावाने आणि अभ्यासाने प्राप्त होऊ शकते.

  याचसाठी आपल्या व्यक्तीमत्त्वाची छाप बोलण्यातून इतरांवर पडण्यासाठी,संभाषण कौशल्याचा साज दिसण्यासाठी ही कला कशी आत्मसात करावी.याची माहिती आशा परुळेकरांनी 'संभाषण चातुर्य'या पुस्तकात दिली आहे. आपणास संभाषणाची कला जोपासण्यासाठी लागणाऱ्या सर्व घटकांचे विस्तृतपणे संकलन केलेले आहे.कमीतकमी शब्दात जास्तीत जास्त आशय स्पष्ट करण्यासाठी संभाषणाची तंत्रे क्लुप्ती अवगत असावी लागतात.याच विचाराने विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना हे पुस्तक दीपस्तंभ ठरेल.या. पुस्तकात सुविचार व त्यांचे महत्त्व, थोरांचे बोल, मोठ्यांच्या छोट्या आठवणी,दंतकथा,विविध विषयांवरील भाष्य ,युक्तिवादी विधाने, वेचक उतारे,गंमतीशीर म्हणी, विविध प्रसंग-विविध अभिवादने आणि विनोदी चुटके व किस्से यांचा समावेश आहे.भाषणासाठी वक्त्यास दिलेला विषयाच्या सादरीकरणाने श्रोत्यांना खिळवून कसं ठेवावे.यासाठी गोष्ट, दंतकथा अथवा मार्मिक चुटकूले आणि समर्पक उदाहरणे दिली आहेत.

माणसाच्या भाषेत शब्दांची गुंफण असते.शब्द हे तलवारी सारखेच दुधारी शस्त्र आहे.असे अनेकदा आपल्याला ऐकायला वाचायला मिळते.शब्दांप्रमाणेच विचारही दुधारी हत्यारा प्रमाणेच असतात.माणसाच्या मनात अनेक बऱ्या-वाईट विचारांचे धुमारे फुटत असतात.यातील दुष्ट व कुविचारांचे विषारी तण उपटून काढणे आणि सुज्ञ व शहाणपणाचे सुविचार जपणे ते संवर्धित करणे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.विचारांचे आदानप्रदान आपण दैनंदिन जीवनात हितगुज करताना करीत असतो.अनेकजण चांगलं सांगताना सुविचारांचे दानच दुसऱ्याच्या पदरात घालून त्याला संस्कारीत उपदेशपर विचार ऐकवितात.या संग्रह पुस्तकात नेहमी वाटणाऱ्या शब्दांचेच सुविचार रुपात आपणास रसग्रहण करताना उलगडा होत जातो.उदाहरणार्थ अभिमान,आशा,अपराध,आदर्श,उत्सव उपकार कला आदी शब्दांचे समर्पक सुविचार आहेत.

  'थोरांचे बोल'या सदरात समाजभान जपणारे थोर पुरुष समाजसुधारक प्रतिभासंपन्न दिग्गज कर्तृत्ववान महानायक की जे समाजाला आपल्या कृतीयुक्त विचाराने प्रभावित करतात.चिंतन मनन करायला लावतात.चुकीच्या मार्गाने वागणाऱ्यांसाठी सद्मार्गाचे दीपस्तंभ ठरतात.अशा समाजाला दिशा देणाऱ्या महनीय व्यक्तींचे बोल म्हणजेच विचारमौक्तिके यामध्ये संकलित केलेले आहेत. महंत, संत,तंत,तत्वज्ञ,विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि महापुरुष यांचे बोल आहेत.सर्वश्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, पंडित जवाहरलाल नेहरू आदी थोर व्यक्तींचे लाखमोलाचे बोल आहेत.

'मोठ्यांच्या छोट्या आठवणी' या लेखात जागतिक विचारवंतांच्या जीवनात घडलेले उद्बोधक व मनोरंजन घटना,प्रसंग व किस्से संक्षेपाने रसिक वाचकांना भाषणातील अलंकारासारखे शब्दसाज समजावेत यास्तव दिले आहेत.

अब्राहम लिंकन, आईन्स्टाईन, जॉर्ज बर्नार्ड शॉ, न्यूटन आणि चार्ली चॅप्लीन यांच्या आठवणी आहेत. 

श्रोत्यांना विषयात गुंतवून ठेवण्याची ताकद कथा आणि गोष्टीत आहे.विषय संजीव आणि रंजक करायला कथानक प्रभावी आहे.याची माहिती कथा या लेखात माहिती प्रस्तुत केली आहे.छोटेखानी २५कथांचा समावेश यात आहे.

'विविध विषयांवरील भाष्य'या लेखात ईश्र्वर धर्म,श्रध्दा, संपत्ती, दृष्टीकोन,किंमत आदी शब्दांची समर्पक शब्दांत परिच्छेदात्मक वेचेआहेत.विषयाच्या अनुषंगाने शब्दांची माहिती दिली आहेत.

'युक्तिवादी विधान' या सदरात एखादा विचार दुसऱ्याला पटवून देण्यासाठी भरपूर शब्द खर्ची घालतो.उपदेशाचे डोसांचा भडिमार करतो.यासाठी "कमीतकमी शब्दात जास्तीत जास्त आशय"व्यक्त होण्याची कला आत्मसात करता येणं महत्त्वाचं आहे. युक्तीवादी विधानांची साखर पेरणी भाषण रसिकांच्या मनात बिंबवले जाते.'उद्या आपण काय पराक्रम करणार आहोत,याची बढाई मारणारी व्यक्ती बहुधा कालच्याच गोष्टींबद्दल बोलत असते.व्यवहार व चांगले शिष्टाचार यांच्या जोरावर आजकाल लोकप्रियता मिळविणारी व्यक्ती दुर्मिळच आहे.'अशी स्टेटमेंट वाक्य आहेत.

काही गमतीशीर,आधुनिक व्याख्या आणि म्हणींचा समावेश केलेला आहे.दिनविशेष साजरे करताना या लेखात,त्या दिवसाचे सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व काय आहे.याचे थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त टीपा स्वरुपात साजेशी माहिती दिली आहे.समारोप सर्वांचे मनोरंजन करायला ,वातावरण हलकं फुलकं करायला विनोदी चुटके आणि किस्से आहेत.व्याख्यानाची खरी लज्जत विनोदी शब्दांत असते.पण विषयानुरूप तारतम्य बाळगून यांचा उपयोग करण्याची सूचनाही लेखिका आशा परुळेकर करतात.भाषण सजीव आणि रंजक  करायला विविध घटकांचा खजिनाच दिलेला आहे. एकाच पुस्तकात संभाषणातील महत्त्वाचे घटक आहेत.त्यामुळे वाचकांना संग्रही ठेवण्यास उपयुक्त आहे.

  श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई


 🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

पुस्तकाचे नाव-संभाषण चातुर्य

लेखिका- आशा परुळेकर

प्रकार-संकलन 

आवृत्ती- द्वितीय जानेवारी २०१५

प्रकाशन- उन्मेष प्रकाशन.पुणे

पृष्ठे-१५१

किंमत-१४०₹

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड