वाचन साखळी काव्य पुष्प-१६०
📚📔वाचन साखळी📔📖✒️📚
वाचन संस्कृतीची चळवळ रुजवायला
वाचन साखळी फेसबुक ग्रुप
पुस्तके वाचनाची उत्कंठा वाढवायला
पुस्तक परिचयाने येते हुरुप ||
व्यासंगी छांदिष्टय भगिनींनी
वाचन साखळी चालविली
पुस्तक परिचय लेखातून
विविध साहित्याची शिदोरी मिळाली||
प्रतिभा लोखंडेताईंनी
वाचन साखळी गुंफली
प्रतिभा टेमकरताईंनी
वाचन साखळी जोडली ||
प्रतिभावंत लेखकांचे साहित्य
प्रतिभेने वेधून वेचले
साहित्य रसिक वाचनप्रेमींना
वाचन साखळीत वाचायला दिले||
वाचलेल्या आवडीच्या पुस्तकाबद्दल
व्यक्त होण्याची संधी मिळते
वैचारिक विचार वैभवाने
ज्ञान माहितीची कक्षा रुंदावते ||
पुस्तकांशी मैत्री दृढ करुया
दिसामाजी वाचन लेखन करुया
वाचन साखळी अखंडित ठेवूया
वाचनसंस्कृतीला हातभार लावूया ||
दर्जेदार प्रसिद्ध साहित्यकृती वाचूया
वाचनाने शब्दभंडार प्रगल्भ करुया
आपल्या भाषेत व्यक्त होवूया
लेखन अभिरुची विकसित करुया ||
साहित्यकलेचे अवघे भांडार
वाचायला मिळती नानाविध प्रकार
वाचनाने विचारांना चालना मिळते
वाचन साखळी वेचक शोधते||
पाखरं झेपावती अंबरी
चिमणचारा शोधायला
वाचन साखळीचे पुस्तकालय
वेचक वेधक वाचायला||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१६०
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
Click on
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment