आंब्याचा मोहर काव्य पुष्प-१७५





आंब्याचा मोहर 

आमराईतल्या झाडावरती 
मोहर लागला दिसू 
गंध दरवळे सभोवती 
निवांतपणे सावलीत बसू ||

हिरव्यागार पानांच्या पुढे
मोहराचे झुबके लोंबती 
वाऱ्याच्या संगतीने 
पानं फुलं सळसळती ||

बहरलेल्या पिवळ्या मोहरातून 
इवल्या इवल्या कैऱ्या लगडती 
तोंडाला मग पाणी सुटते 
नकळत हाती दगडं येती||

नेम धरुनी दगड भिरकावतो 
अचूक माराने कैऱ्या पडती 
कोण हायरे तिकडं आवाजाने
घाबरगुंडीने  धांदल उडती||

पटकन कैऱ्या उचलून  
तकाट पळत सुटतो  
चटणीमीठा बरोबर कैऱ्या
मिटक्या मारत खातो||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१७५
फोटो सौजन्य श्री दादासाहेब कुदळे व सतिश जगताप सर
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड