किरण शलाका काव्य पुष्प-१७७
💫किरण शलाका💥
नेत्रदीपक मनमोहक रूप
अस्ताला जाणाऱ्या दिवाकराचे
भंडाऱ्याच्या मुक्त उधळणाने
शिंपण झाले रंगाविष्काराचे ||
चराचराला ऊर्जा देणारा
डोंगरा पल्याड निघाला
प्रकाशाने मावळतीला
सोनेरी किरणोत्सव झाला ||
तेजाने किरण शलाका तळपली
फोकस दिसे वर आकाशी
तेजोमय प्रकाश किरणांचा
कवडसा पडला वसुंधरेशी ||
स्वागत करती ऊसाचे तुरे
रम्य दृश्याने मन बावरे
कुंचल्यातून चितारलेले
सूर्यास्ताचे सौंदर्य पहा रे ||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१७७
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
मस्तच सनसेट
ReplyDelete