भटकंती काव्य पुष्प-१६५
भटकंती
सह्याद्रीच्या डोंगररांगा मनमोहक विहंगम
अनवट वाटेने पायदळी तुडवायला
आव्हानांना सामोरे जायला पाहिजेत दम
दुर्ग किल्ले डोंगर दऱ्या भटकंतीला ||
दोस्तांसंग निसर्ग भटकंतीने
मनाला मिळते परमसुख
निसर्गसृष्टीच्या नजाऱ्याचे
नयनी लाभते नेत्रसुख ||
विरंगुळ्याची ठिकाणं हमखास
तनमनाला देती आनंदसुख
निसर्गसोबत्यांच्या सहवासाने
क्षणभर धूसर करती दु:ख ||
निसर्गाचं सौंदर्य
मनसोक्त न्याहाळूया
वनाची जैवविविधता
गाईडकडून ऐकूया ||
परोपकाराची कृतज्ञता
मनापासून जाणूया
पर्यावरणासाठी एकीनं
सदैव काम करुया ||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१६५
☘️🍁🌿☘️🍁🌿☘️
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment