सूर सनईचे काव्य पुष्प-१८३




🎼सूर सनईचे🎹

सनईचे सूर कानी आले 
मंगल माहोल निर्मिले
विवाह सोहळ्याचा स्नेह आनंद वाढे 
जेव्हा पाहुण्यांची गळाभेट घडे||

सनईचे मंजूळ सप्तसूर 
साथीला चौघड्याचा निनाद 
रागांच्या सूरावटीचा मधूर आवाज 
मंगल वाद्याचा सुस्वर नाद||

 सुरांचे गुंजन रांगांची धून 
श्रवणिय गाण्यांनी मैफिल रंगली
सनई चौघड्याची जुगलबंदीने
ताल सूरांची गट्टी जमली||

 तरल भावनांचा सुषिर आविष्कार
सनई चौघड्याचे वादन बहारदार 
विवाह वेदीवरचं सुरेल पान
मंगल सूरांची सौंदर्य खाण||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१८३
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:// raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड