थंडीचा महिना हिवाळा काव्य पुष्प-१७४
थंडीचा महिना (हिवाळा )
दिवाळीत पहाटे अभ्यंगस्नान घडते
थंडीची मग चाहूल लागते
गारठा पडायला सुरुवात होते
दिवस लहान तर रात मोठी होते ||
रम्य पहाटे फिरायला जावूया
रामप्रहरी व्यायाम करुया
उबदार कपडे परिधान करुया
आरोग्याची काळजी घेवूया ||
शेतशिवारात फेरफटका मारत
पाहूया
गवताच्या पात्याची नक्षी दैवाराची
पानांपानांवर चमकती मोती
साक्ष पिवळसर प्रकाशाच्या किरणांची ||
गारठ्याने भरु लागली हुडहुडी
की चघाळाची करुया शेकोटी
शेकत शेकत गप्पा मारत
हास्यविनोदाची करुया शाब्दीक कोटी ||
वाढत्या क्षुधेला गरम चमचमीत
चटकदार मेनूंनी करुया शांती
सेवन करायला स्निग्ध पदार्थ
हरभऱ्याची भाजी पावट्याची आमटी ||
महाबळेश्वरची गुलाबी थंडी
अनुभवायला पर्यटक जाती
वाऱ्याच्या थंडगार स्पर्शाने
तन मनाला मोहित करती||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१७४
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
फोटो सौजन्य फेसबुक.
Comments
Post a Comment