पुरणपोळी काव्य पुष्प-१८०



पुरणपोळी 
सणवारांची मिष्टान्न मेजवानी 
धार्मिक कार्यात नैवेद्य अग्रमानी  
पुरणपोळीचा बेत करु का धनी
धजल्या घरातल्या सर्वजणी ||
 
तेलची पोळी कटाची आमटी
वरण भाताची मुद चटकदार भजी 
लिंबाची फोड मीठ चिमूटभर 
कुरडई पापड मेथीची भाजी||
  
मन लावून रांधलेला स्वयंपाक
आग्रहाच्या अगत्याने वाढणं  
गरमपोळीवर तूपाची धार 
गुळवणी संग मनसोक्त खाणं ||

आईच्या हातच्या चवीचं 
कवतिक सारी करती 
कटाची पिवळी आमटी
वाटीतली फुकूण फुरकती ||

भोजनाची बसली पंगत 
गरम पोळी येता ताटी 
गुळवणीला पोळीचा घास 
मिष्टभाषणी करत खाती||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१८०
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड