माझं गाव ओझर्डे काव्य पुष्प-१८१


          


ओझर्डे माझं गाव
चंद्रभागेच्या ओढ्याकाठी माझं गांव
श्री पद्मावती देवीचे सर्वदूर नांव
श्री सोनेश्वर महाराजांचा कृपाप्रसाद
श्री तुळजाभवानी देवीचा आशिर्वाद ||

विठ्ठल रखुमाईची अभंगवाणी
शिवारात खळाळतं कृष्णेचं पाणी
राउळीशोभे लक्ष्मण रामसीता
पिंपळा समोरी हनुमान दाता||

मायमाऊली तुकाबाई माता
संगतीने लक्ष्मीबाई माता
माझं गाव ,ओझर्डे  गांव
सामाजिक भान जपणारं गांव ||

सोंगांची परंपरा जपणारं गांव
यात्रा नवरात्रौत्सव करणारं गांव
बागायती शेती फुलविणारं गांव
क्रिकेटच्या स्पर्धा भरविणारं गांव ||

पुरोगामी विचारांचे प्रेरक गांव
विकासाच्या योजना राबविणारे गांव
समाजाची वाहवा मिळविणारे गांव
शासकीय सन्मान झालेले गांव ||

समस्त जनांचे सहकार्य लाभते
तिथं आनंदाने सुखसमृद्धी नांदते
श्री पद्मावती देवी सुखात ठेवते
सदैव आम्हा  कृपाछत्र लाभते||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प--१८१

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड