चुलीवरची भाकरी काव्य पुष्प-१७८




चुलीवरची भाकरी

बसायला घेतला पाट 
चुलीचा मंदाग्नी थाट 
परातीत मळलेले पीठ 
जीवनातले भोजन पीठ ||

तावाने भाकरी भाजते 
निखाऱ्यावर ती शेकते 
चटके ताव सहन करते
तावून सुलाखून निघते ||

एक भाकरी तव्यावर 
एक भाकरी निखाऱ्यावर 
चवड भरली टोपल्यावर 
फुगलेली खरपूस भाकर ||

पापुडयाची लालसा झाली  
पाहूनी तोंडाला सुटे पाणी
पण बोटांना वाफ लागली 
भरलं मन नुसतं पाहूनी ||

खलबत्त्यात ठेचा मिरचीचा 
कालवण करण्या भाजीचा
चुलीवरल्या भाकरीचा 
घास खातो समाधानाचा||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१७८
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
फोटो सौजन्य फेसबुक

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड