अथांग जलाशय दासवे काव्य पुष्प-१७१





अथांग जलाशय

शांत शीतल स्वच्छ जलाशय 
एकटक पाहताना भान हरपले 
प्रदुषणविरहीत स्वच्छ हवा 
मन प्रसन्न तजेलदार झाले |

अगणित तरंग लहरी 
जलाशयात उठतात 
मनातल्या विचार तरंगाना 
क्षणभर विसावा देतात|

स्वच्छ सुंदर नितळ पाणी 
पहात बसलो सुखासनी 
ध्यान लागते बगळ्यावाणी
पक्ष्यांची गुंज येते कानी|

रम्य परिसर ओढ वाढवे 
निसर्ग सौंदर्याला तनमन
भुलले 
वेचक वेधक दृश्ये न्याहाळले 
मोबाईल मध्ये चित्र टिपले |

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१७१
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड