जलाशयाची प्रतिमा काव्य पुष्प-१५९
❄️जलाशयातील प्रतिमा ❄️
अथांग जलाशय धरणाचा
संथ वाहणाऱ्या कृष्णेचा
भास्कराच्या प्रतिमेचा
चमचमणाऱ्या ताऱ्यांचा ||
तरंगावर दिसे दिवसा चांदण्या
जलदीप प्रकटले दिवाळीच्या स्वागता
नक्षी,रांगोळी ताऱ्यांची उपमा
अकल्पित दृश्याने सुचली कविता ||
नजरती केटस् पाॅईंट दूरवर
विलक्षणी डोंगर महाबळेश्वर
अर्धचंद्राकृती टेकडाचा आकार
फुलदाण्यांचे झुबके हिरवेगार||
जलतरंगावरची वलये
विरती काठावरती
निसर्गाच्या सहवासाने
ताणतणाव धूसरती ||
अथांग जलाशय मनाला भुरळतो
पाण्यात उतरायला मोहित करतो
क्षणभर तनमनाला आल्हाद देतो
पोहणं भाकऱ्या खेळणं स्मरतो||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१५९
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
click on https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment