नवलाईची टेकडी काव्य पुष्प-१६७
🏞️ नवलाईची टेकडी ⛰️
रायरेश्वराच्या डोंगररांगेतील
उपशाखेवर पांडवगड ऊभा
मांढरदेव घाटातील मालवाठारच्या
टेकडीवर कातळात पक्षी जटायू ऊभा ||
टेकडीच्या माथ्यावरील रुप कातळाचे
माथ्यावरुन भासते रुप जटायूचे
करवंदाच्या जाळ्या गवत पिवळे
झाडावर बसून सिनरी न्याहाळे ||
आडबाजूच्या वाटनं जाती
नजरेत भरती डोंगर पाणी
नयनरम्य परिसरात गुंजती
पानांसवे वाऱ्याची गाणी ||
कांचन रोपटी सभोवती
सावलीत गप्पा झोडती
भटकंतीची अनवट वाट
तिथं भेटतो अद्भुत थाट||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१६६
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
प्रतिक्रिया....
काळी मैनेचे पसरे जाळे ,
दगडधोंड्याचा डोंगरावरी l
निसर्गाच्या या आड वाटेवर,
मनासह आरोग्य प्रसन्न करी ll
सागर गजरे
कराड
Comments
Post a Comment