आण्णांना विनम्र अभिवादन काव्य पुष्प-१७०
आण्णांना विनम्र अभिवादन ❗
(आभाळा एवढं कार्य शिक्षकांसाठी करणारे झुंजार शिक्षक नेते आदरणीय माजी आमदार स्व.शिवाजीराव पाटील )
शिक्षकांच्या आराध्य दैवताच्या
कार्यकर्तृत्वाचा सुगंध दरवळे
नेते प्राथमिक शिक्षक संघाचे
ज्ञानयात्रींचे जीवनमान फुलवले❗
महाराष्ट्राची मैदानी तोफ
शिक्षक अधिवेशनात गर्जे
शिक्षकांचे ज्वलंत प्रश्न
अभ्यासपूर्वक शब्दात सजे ❗
संघटन कौशल्याने संघटना उभारली
अस्मितेने प्रश्र्नांची उकल केली
अधिवेशनात मागण्यांना मंजूरी मिळवली
शासन दरबारी पत वाढविली ❗
शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी
सदैव अहोरात्र कार्यरत राहिले
हजरजबाबी समयसुचकतेने
शिक्षकांचे प्रश्न अविरतपणे
सोडविले ❗
संघटनेच्या संवर्धनासाठी एक होऊया
शिक्षकांच्यात नवचैतन्याची लाट आणूया
आपले साम्राज्य आपणच वाढवूया
हीच श्रद्धांजली आण्णांना अर्पूया ❗
आण्णांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन🌹🙏🏻
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१७०
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogdpot.vom
Comments
Post a Comment