माझं लेणं कुंकू काव्य पुष्प-१८६







माझं लेणं कुंकू

न्याहाळते आरश्यात रुप माझं
लेवते मी सूर्यावानी कुंकू माझं
सौभाग्याचं लेणं कुंकू माझं 
कपाळी शोभते कुंकू माझं ||

सुवासिनीन  मी ग 
रोज मागते मागणं 
माझ्या धन्याला बळ दे
सुखा समाधानात नांदणं||

संसारात फुलेल चांदणं 
तुला करीते वंदन 
आभाळमायेचं फुलणं
घर होईल नंदनवन||

सौभाग्याचा अलंकार 
कपाळी शोभतो 
शुभविवाह प्रसंगी
भाळी मळवट सजतो||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१८६
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड