संत गाडगेबाबा काव्य पुष्प-१७६
संत गाडगेबाबा
माणसात देव पाहणारे संत
मनाची स्वच्छता करणारे संत
लोकजागृतीचा वैचारिक पंथ
सदैव जपणारे आधुनिक संत ||
केली खराट्याने ग्रामस्वच्छता
किर्तनाने झाली मनाची स्वच्छता
समाजमनात मिळविली सत्ता
गिरवूया त्यांच्या विचारांचा कित्ता ||
अंधश्रद्धेला अजिबात थारा नाही
बुरसटलेल्या विचारांना चालना नाही
शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही
रुण काढून सण साजरा नाही||
गाडगेबाबांचे हे विचार रुजवूया
माणसातील माणुसकी शोधूया
भुकेल्यांना अन्न पशुपक्ष्यांना अभय
सगळ्यांना करावे निर्भय||
शाळा हेच ज्ञानमंदिर थोर
हेच जीवनाचे खरे सार
मदतीचा ओघ वाढवा फार
शिक्षणाने मिळेल आधार||
काव्य पुष्प-१७६
Comments
Post a Comment