गारांचा पाऊस काव्य पुष्प -१८७
गारांचा पाऊस
ढग दाटून आले
आभाळ श्यामल झाले
मेघ गर्जत आले
वारं वेगाने सुटले|
पावसाची चिपळी वाजली
गारा, जलधारा बरसली
गारांचा ताशा ठेका धरतोय
संबळ,हलगी वाजवतोय|
गार वाऱ्याची झुळूक येती
काहिलीला गार करती
मातीतली ढिकळं इरघळती
कणकण एकजीव होती |
गारवारं सुटलय मंद
माहोल झालाय बेधुंद
ढगाळी हवा कुंद
दरवळलाय मृदेचा गंध |
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१८७
Comments
Post a Comment