प्रश्नमंजूषा शुभेच्छा ❗ काव्य पुष्प-१७९



प्रश्नमंजुषेचा अवलिया 
 (श्री नितीन जाधव सरांची प्रश्नमंजूषा उपक्रम   )
सर्जनशीलतेचा ध्यास घेऊनी 
 वाचण्याने वेचक शोधती 
माहितीचे करण्या उपयोजन
बनवती अचूक प्रश्ननिर्मिती ||

सामान्यज्ञान करण्या वृध्दिंगत 
सर्वच विषयांचा अंतर्भाव करती 
सुसंगतपणे मांडणी करुनी 
विद्यार्थी गुणवत्तेचा आलेख साधती ||

विद्यार्थ्यांची वाढवण्या गुणवत्ता
प्रश्नमंजुषा मालिकेचे शतक ठोकले 
दर्जेदार प्रश्र्नांची झाली सुबत्ता 
प्रश्नांचे सदर ई -पेपरात  झळकले ||

प्रश्नमंजुषा मालिकेचे उभारले पर्व 
कौतुक करती मित्रगण सर्व 
पुस्तकरूपाने प्रकाशित करायला  
हीच सदिच्छा आपल्या उपक्रमाला||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१७९
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड